घरताज्या घडामोडीमेडिकलच्या विद्यार्थ्यांना पारंपारिक विद्यापीठात नोंदणीची सूट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पारंपारिक विद्यापीठात नोंदणीची सूट

Subscribe

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास केंद्र सरकारची मान्यता

नाशिक ः पारंपारिक विद्यापीठांमार्फत चालविण्यात येणारे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम 2006 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे वर्ग केले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना पारंपारिक विद्यापीठाकडे प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र,आता केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक विद्यापीठात नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारचे शुध्दिपत्रक नुकतेच विद्यापीठास प्राप्त झाले आहे. त्यानुसार पारंपारिक विद्यापीठाची पदवी धारण करणार्‍या विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात प्रवेश घेताना अडसर निर्माण होत होता. याविषयी कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी भारतीय आयुर्विज्ञान परिषद व केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर केला होता. तसेच नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय परिषदेच्या सचिवांकडे सातत्याने पाठपुरावा केला. पारंपारिक विद्यापीठाकडे प्रवेशित विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठाची पदवी असल्यामुळे त्यांना विद्यापीठांकडून मान्यता मिळाली पाहिजे. जेणेकरुन आरोग्य विज्ञान विद्यापीठात त्यांना प्रवेश घेता येईल. या प्रस्तावास केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली.

सात महाविद्यालयांचा समावेश
पारंपारिक विद्यापीठांमध्ये राज्यातील कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे. सोलापूरचे डॉ.व्ही.एम. वैद्यकीय महाविद्यालयातील पाच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ, आंबेजोगाई येथील एस. आर. टी. आर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दोन, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रत्येकी एक वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -