मोबाईलसाठी साथीदार मजुराची हत्या; शेतमालकाच्या आदेशाने शिर कापून धड फेकले नदीत

नाशिक : सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत (दि.११) रोजी सायंकाळच्या सुमारास गंगानगर देवीमंदीर जवळ गोदावरी नदी पात्रात एका शिर नसलेल्या युवकाचा मृतदेह मिळून आला होता. या मृतदेहाचे शीर त्याठिकाणी मिळून आले नव्हते. तर, मृतदेहाचे फक्त धड गोणपट मध्ये घालून ते गोणपट तारेने बांधून त्यास गोदावरी नदीपात्रात टाकून देण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी या गुणहयाची उकल करत तो मृतदेह तेथील्च एका शेतावर शेतमाजुरू करत असलेल्या युवकाचा असून त्याला साथीदार मजुरांनी मोबाइल घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर डोक्यात सळईने वार करत ठार केले होते. त्यानंतर शेत मालकाने बदनामीच्या भीतीने त्याचे शीर वेगळे करण्यास सांगितले व या सर्व आरोपींनी त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संशयित शरद वसंत शिंदे, वय ३३ आणि आलीम लतीफ शेख, वय २० हे दोघे खेरवाडी येथील शेतकरी जगदीश संगमनेरे व संदीप संगमनेरे यांचे शेतात सालदार म्हणून शेती काम करत होते. यातील जगदीश संगमनेरे यांनी मागील महीन्यात पेठ फाटा, नाशिक शहर परिसरातून हितेश नावाच्या मजूरास शेती कामकाजासाठी खेरवाडी येथे आणले होते, तेव्हापासून हितेश हा सालदार शरद व आलीम यांचेसोबत शेती काम करत होता. ७ फेब्रुवारी रोजी रात्रीचच्या सुमारास हितेश व शरद यांचेत मोबाईल घेण्यावरून वाद-विवाद झाले, त्यात हितेश याने
शरद व आलीम यास नाशिकवरून पोरं घेवून येतो व तूमचा बेत पहातो अशी धमकी दिल्याचा राग मनात धरून आलीम याने हितेशचे डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला, त्यात तो रक्तबंबाळ होवून खाली कोसळून मयत झाला. याच दरम्यान, त्यांचे मालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे व जगदीश यांचा मुलगा योगेश संगमनेरे असे त्याठिकाणी आले. त्यावेळी सदर ठिकाणी घडलेला प्रकार पाहून गावात बदनामी होईल तसेच बटाईने करत असलेली शेती जाईल आणि शेती कामास पुन्हा मजूर मिळणार नाही. यादृष्टीने मालक जगदीश व संदीप यांचे सांगण्यावरून सालदार शरद याने बाजूस पडलेल्या कु-हाडीने हितेश याचे गळयावर व मानेवर घाव घालून त्याचे धड व शीर वेगळे केले.

त्यानंतर हितेश याचे प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी सर्वांनी मिळून मृतदेह व शीर हे वेगवेगळ्या गोणपटात टाकून, त्यास तारेने बांधून त्यांचेकडील स्विफ्ट कारममधून सायखेडा गावचे दिशेने जावून सायखेडा गावातील गोदावरी नदीवरील पुलावरून सदरचा मृतदेह व शीर असे नदीत फेकून दिले असल्याबाबत कबूली दिली आहे. सदर वेळी संदीप व योगेश हे मोटरसायकलवरून स्विफ्ट गाडीचे पुढे चालून रस्त्यात काही अडचण येते काय? याची चाचपणी करत होते.

सदर खूनाच्या गुन्हयात आरोपी मजूर शरद वसंत शिंदे आणि आलीम लतीफ शेख यांच्यासह शेत मालक जगदीश भास्कर संगमनेरे, संदीप भास्कर संगमनेरे, योगेश जगदीश संगमनेरे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. पप्पू कादरी यांचे पथक करीत आहे.