घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगड-किल्ले, ऐतिहासिक वारसांच्या संवर्धनासाठी तीन टक्के निधी; 'इतके' कोटी होणार खर्च

गड-किल्ले, ऐतिहासिक वारसांच्या संवर्धनासाठी तीन टक्के निधी; ‘इतके’ कोटी होणार खर्च

Subscribe

नाशिक : राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादींच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षासाठी ३ टक्के निधीची तरतूद करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानूसार नाशिक जिल्ह्यासाठी १८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने १४ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित केला आहे. महाराष्ट्राला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या असून, त्यात कातळात खोदलेल्या जागतिक वारसा म्हणून सुप्रसिध्द अशा अजिंठा-वेरुळ लेण्या, रायगड व सिंधुदुर्ग यासारखे किल्ले, यादव व मराठा काळात उभी राहिलेली व सुंदर शिल्पाकृतींनी नटलेली गडचिरोली जिल्ह्यातील श्री मार्कंडेय व श्री त्र्यंबकेश्वर यासारखी मंदिरे, चंद्रपूर, बल्लारपूर येथील किल्ले, राजुरा येथील श्री सिध्देश्वर मंदिर, भद्रावती येथील विजासन लेणी, मध्ययुगीन दर्गे व मकबरे तसेच वसाहत कालीन स्थापत्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

ऐतिहासिक व प्राचीन स्मारकांपैकी केंद्र सरकारद्वारा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मार्फत २८८ स्मारके राष्ट्रीय महत्वाची म्हणून जतन केली आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत ३८७ स्मारके संरक्षित म्हणून घोषित केलेली आहेत. यामध्ये घटोत्कच व धाराशीव ही लेणी, राजगड, सिंहगड, माणिकगड यांच्यासारखे किल्ले तसेच गड जेजूरी, निरानृसिंहपूर, श्री तुळजाभवानी यांसारखी मंदिरे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरुषांची जन्मस्थळे व गेट वे ऑफ इंडिया अशा स्मारकांचा समावेश आहे. राज्यस्तरीय योजनांमध्ये सर्व संरक्षित स्मारकांचे संवर्धन करण्यासाठी उपलब्ध असलेला निधी कमी असल्याने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानूसार जिल्हा वार्षिक निधीतून या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीतून १८ टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -