घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र निवडणूक : मतदारयादी विरोधात 10 हरकती

मविप्र निवडणूक : मतदारयादी विरोधात 10 हरकती

Subscribe

मविप्र निवडणूक हालचाली : कार्यकारिणीच्या बैठकीत आज अंतिम निर्णय

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारुप (कच्चा) मतदार यादींवर बुधवार (दि.२९) रोजी अखेरच्या दिवशी विविध प्रकारच्या १० हरकती प्राप्त झाल्या आहेत. याव्यतिरीक्त नावात दुरुस्तीसाठी तीन तर, पत्ता बदलण्यासाठी 12 अर्ज प्राप्त झाले आहेत. या हरकतींवर कार्यकारणीच्या गुरुवारी (दि.30) होणार्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची पुरवणी यादी संस्थेच्या कार्यालयात २५ ते २९ जून २०२२ पासून सभासदांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हरकतीसाठी सादर करण्यासाठी बुधवार अखेरचा दिवस होता. प्रसिध्द झालेल्या सभासद यादीवर १० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याशिवाय नावात बदल करण्यासाठी तीन अर्ज प्राप्त झालेले आहेत. सभासदांच्या पत्ता बदलण्यात यावा याकरिता १२ अर्ज संस्था प्रशासनाकडे प्राप्त झालेले आहेत. गुरूवारी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हे अर्ज ठेवले जातील त्यानंतर त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. प्रमुख हरकतींमध्ये मदन पवार यांनी अमृता पवार यांच्या सभासदत्वाविषयी हरकत घेतली आहे. तर विरोधकांनी पुरवणी यादी विरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, हरकती निकाली निघाल्यानंतर अंतिम यादी धर्मादाय आयुक्तांकडे दिली जाईल. त्यानंतर शिक्षण संस्थेतर्फे निवडणुकीसाठी लवादाचा नियुक्ती केली जाईल. निवडणुकीसंदर्भातील सर्व निर्णय हा लवाद घेण्यार असल्याने लवकरच निवडणुकीची घोषण होईल, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. सभासदांनी अखेरच्या दिवशी कार्यालयात गर्दी केल्याचे दिसून आले.

- Advertisement -

15 जुलैपर्यंत निवडणुकीची घोषणा शक्य

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा 15 जुलैपर्यंत होण्याची शक्यता बळावली आहे. प्रारुप मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर आणि संस्थेचा वार्षिक लेखापरिक्षण अहवाल पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा होते. अहवाल अंतिम करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हा अहवाल निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सभासदांसमोर मांडला जातो. सरचिटणीस नीलिमा पवार यांनी 14 जून 2017 रोजी संस्थेचा अहवाल मांडला होता. त्याआधारे साधारणत: एक महिना अगोदर निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणुकीसाठी एक लवाद नियुक्त केला जाईल आणि ते या निवडणुकीची घोषणा करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -