घरमहाराष्ट्रनाशिकनरहरी झिरवाळांनी सुरेंद्र कंकरेज यांना धरले धारेवर

नरहरी झिरवाळांनी सुरेंद्र कंकरेज यांना धरले धारेवर

Subscribe

फाईल अडवल्याप्रकरणी उपटले कान

नाशिक : विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांना चांगलेच धारेवर धरल्याचे समजते. विकास कामांच्या फाईल्स अडवल्या जात असून, यापुढे असा प्रकार घडायला नको म्हणून कानही उपटल्याचे समजते.

विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.9) मंत्रालयात पेठ व दिंडोरी येथील आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिप. चे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, उपवनसंरक्षक पंकज धर, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बांधकाम विभाग एकच्या कार्यकारी अभियंत्यांच्या व्हीआयपी कल्चर विरोधात सदस्य, पदाधिकाजयांसह ठेकेदारांमध्ये मोठा रोष तयार झाला आहे. सदर कार्यकारी अभियंता भेटत नाही, कार्यालयात येत नाही, फाईली काढत नाही, पंचायत समितीत बसून कामकाज करतात, सदस्यांसह लोकप्रतिनिधींचे मोबाईल घेत नाही अशी तक्रारी अभियंत्याविरोधात होत्या.

- Advertisement -

यात अध्यक्ष झिरवाळ यांच्या मतदारसंघातील फाईली अडविल्याने कार्यकारी अभियंत्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी, विधानभवनात बुधवारी (दि.७) बैठक घेतली. बैठकीत दिंडोरी व पेठ तालुक्यातील विविध योजनांचा आढावा झाला. पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील रस्ते आणि विविध पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी यावेळी दिल्या. झिरवाळ यांनी कार्यकारे अभियंता सुरेंद्र कंकरेज यांना चांगलेच खडेबोल सुनावले. कार्यालयात का घेत नाही, सदस्यांना भेटत का नाही अशी विचारणा यावेळी झाल्याचे कळते. लोकांसाठी काम करण्यासाठी आपण आहोत असेही झिरवाळ यांनी यावेळी सुनावले. त्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी आपण कामात सुधारणा करणार असल्याचे सांगितले. पुन्हा अशी चूका होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. चुक झाल्यास कारवाई करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘व्हीआयपी’ वागत असल्याचा आरोप

जिल्हा परिषद बांधकाम एक विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज हे व्हीआयपी पध्दतीने वागत आहेत. अर्धावेळ काम करतात आणि उर्वरित वेळेत पंचायत समितीत फाईल्स मागवतात. त्यामुळे ठेकेदारांसह सदस्यांमध्येही नाराजी पसरली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -