घरमहाराष्ट्रनाशिकदेशातील सर्वाधिक अपघातप्रवण 'ब्लॅकस्पॉट' नाशिकमध्ये

देशातील सर्वाधिक अपघातप्रवण ‘ब्लॅकस्पॉट’ नाशिकमध्ये

Subscribe

नाशिकमध्ये तब्बल ९८ ब्लॅकस्पॉट; अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर, १० सेकंदात ६०वाहने होणार स्कॅन

नाशिक : जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर रडार यंत्रणा राबवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार रडार यंत्रणा भरधाव वाहनांवर वॉच ठेवणार आहे. ही रडार यंत्रणा १० सेकंदात ६० वाहने स्कॅन करणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनमालकांना आपोआप दंडाचे चलन पाठवले जाणार आहे.

दहा व त्यापेक्षा जास्त अपघात झाल्यास आणि या अपघातात पाच व त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्यास त्याला अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॉट) म्हणून ओळखले जाते. वाढते शहर, वाढती वाहने, त्या तुलनेत अरुंद रस्ते, रस्ते आणि उड्डाणपुलाचे चुकीचे बांधकाम केल्यामुळे ब्लॅक स्पॉट वाढले आहेत. जिल्ह्यात ९८ ब्लॅक स्पॉट असून, हजारो अपघात झाले आहेत. यात शेकडो चालक व प्रवाशांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात देशभरात सर्वाधिक ९८ ब्लॅकस्पॉट असून, सर्वाधिक स्पॉट चांदवड व सिन्नरमध्ये आहेत. पोलिसांसोबतच जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. त्याआधारे भरधाव वाहनांवरदेखील अचूक लक्ष ठेवले जाणार आहे.

- Advertisement -

हे आहेत जिल्ह्यातील ९८ ब्लॅक स्पॉट्स (कंसात पोलीस ठाण्याचे नाव)

पिंपरी फाटा (इगतपुरी), दहावा मैल (ओझर), मुंगसे फाटा (मालेगाव तालुका), वडाळीभोई शिवार (वडनेर भैरव), खडकजाम शिवार (वडनेर भैरव), उमराणे (देवळा), एसटी कॉलनी (सिन्नर), कुंदेवाडी फाटा (सिन्नर), चांदवड चौफुली (चांदवड), राहुड घाट (चांदवड), मुंढेगाव फाटा (गोटी), धनगरबाबा मंदिर (नाशिक तालुका), विल्होळी गाव (नाशिक तालुका), आठव मैल (नाशिक तालुका), मालवडी शिवार (वावी), खोपाडी फाटा (वावी), सब स्टेशन (वावी), शिरवाडे फाटा (पिंपळगाव), महिरवाणी शिवार (त्र्यंबकेश्वर), बोकडदारे शिवार (निफाड), पांढुर्ली फाटा (सिन्नर), सावरगाव शिवार (येवला), कश्यपी धरण (हरसूल), वीरगाव (सटाणा), सावकी फाटा (सटाणा), कातरवेल बारी (जायखेड), चिराईबारी (जायखेडा), म्हसोबा माथा (लासलगाव), ओझरखेड (वणी), वसालीबारी घाट (घोटी), दिक्षी गाव (ओझर), रामपूर फाटा (वावी), पालखेड फाटा, जोगमोडी गाव (पेठ), कवटी फाटा (वाडीवर्डे), रायगडनगर (वाडीवर्डे), देवरपाडे फाटा (मालेगाव), जीएमडी कॉलेज (सिन्नर), देवपूर फाटा (वावी), हरसूल फाटा (सिन्नर), गोंदेगाव फाटा (सायखेडा), भावडबारी घाट (देवळा), शिवरे फाटा (निफाड), वाघोबा मंदिर (त्र्यंबकेश्वर), अंदरसुल मार्केट (येवला), वालदेवी पूल (वाडीवर्डे), चाळीसगाव फाटा (मालेगाव), चिंचवे (देवळा), हॉटेल पुरोहित (सिन्नर), आडवा फाटा (सिन्नर), मालेगाव फाटा (सिन्नर), केला कंपनी (सिन्नर), चाचडगाव (दिंडोरी), देवीचा माथा (चांदवड), टेल्को शोरुम (छावणी), मिरगाव फाटा (वावी), स्टार हॉतेल (पवारवाडी), डुबरे नाका (सिन्नर), घोरवड घाट (सिन्नर), वनारवाडी फाटा (दिंडोरी), रोकडोबा फाटा (छावणी), साकुरफाटा (वाडिवऱ्हे), आठंबेगाव (कळवण), नाकेपाडा (हरसूल), नांदगाव शिवार (वाडिवऱ्हे), सुकेणा गाव (ओझर), जोपूळगाव (पिंपळगाव), कसरनाला ( एमआयडीसी, सिन्नर), गिरणारे (नाशिक तालुका), कानमंडळे गाव (वडनेर भैरव), वडनेर भैरव मंदिर, दहेगाव (चांदवड), मावडी फाटा (वणी), वाके फाटा (मालेगाव तालुका), संगमनेर नाका (सिन्नर), रेस्ट हाऊस (सिन्नर), कोकणगाव फाटा (पिंपळगाव), बेलू फाटा (सिन्नर), आगसखिंड फाटा (सिन्नर), चांदुरी चौफुली (सायखेडा), लखमापूर फाटा (वणी), ओझरखेड धरण (वणी), पारेगाव चौफुली (येवला शहर), गोबापूर गाव (कळवण), बेहड पाडा (हरसूल), लोणवडी पूल (पिंपळगाव), ब्रोकदरा गाव (निफाड), धुळवंडी फाटा (वावी), लासलगाव फाटा (मनमाड), सिन्नर फाटा (घोटी), मुंडेगाव (घोटी), मुसळगाव फाटा (सिन्नर एमआयडीसी), मोहदरी घाट (सिन्नर एमआयडीसी), सावडगाव फाटा (पवारवाडी), गावठाण (सिन्नर), आराई शिवार (सटाणा), वरवंडी (दिंडोरी)

जिल्ह्यात महामार्गांवर हेल्मेटसक्ती

नाशिक शहराप्रमाणेच आता जिल्ह्यातील वर्दळीचे रस्ते आणि महामार्गांवरदेखील हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे. दुचाकीचालकांचे हेल्मेट हरवले जावू नये, यासाठी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी वाहनांमध्ये हेल्मेटसाठी लॉक व जीपीएस सिस्टीम बसावावी. त्यामुळे वाहनमालकांना दुचाकी सुरक्षित राहील.

\“जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग आणि सहा राज्य महामार्ग जातात. या मार्गांवरील रस्त्याचे दुभाजक काही ठिकाणी खाली-वर आहेत. त्यामुळे जीवघेणे अपघात घडत आहेत. अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणशी संपर्क साधला आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगावर नियंत्रण ठेवावे.” : सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -