घरमहाराष्ट्रनाशिकनवीन नाशिक, सातपूर भागात शुक्रवारी पाणी येणार नाही

नवीन नाशिक, सातपूर भागात शुक्रवारी पाणी येणार नाही

Subscribe

सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र प्रभाग क्रमांक २६ व २७ ला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे (दि. १५) सकाळी ९ वाजेनंतर तसेच दुपारी व सायंकाळचा पाणीपुरठा नवीन नाशिक व सातपूर भागात होणार नाही. शनिवारी (दि. १६) सकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून प्रभाग क्रमांक 26 व 27 मधील जलकुंभ भरण्यात येतो. तसेच पाणी वितरणाकरीता 900 मी.मी. व्यासाच्या डी.आय. पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाईपलाईनवरील अंबड जलकुंभाजवळील मुख्य व्हॉल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे येथे आता नवीन व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. परिणामी शुक्रवारी सातपूर व नवीन नाशिक विभागातील पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शनिवारी (नि. १६) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

या भागात शुक्रवारी व शनिवारी सकाळी पाणी येणार नाही

  • प्रभाग क्र.25– इंद्र नगरी, कामठवाडे गाव व परिसर
  • प्रभाग क्र 26– मोगल नगर, साळुंके नगर, वावरे नगर, शिवशक्ती नगर व चौक, आयटीआय परिसर, खुटवड नगर मटाले नगर, आर्शिवाद नगर, संजीवनगर, जाधव संकुल, पाटील पार्क विरार संकूल
  • प्रभाग क्र.27– अलिबाबा नगर, दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्त नगर, कारगील चौक, चुंचाळे गांव परिसर
  • प्रभाग क्र.28– लक्ष्मी नगर, अंबड गांव व परिसर, माऊली लॉन्स परिसर, वृंदावन नगर, अंबडगांव, ते माऊली लॉन्स मधील पूर्व व पश्चिमेकडील परिसर
नवीन नाशिक, सातपूर भागात शुक्रवारी पाणी येणार नाही
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -