घरमहाराष्ट्रनाशिकऊन, पाऊस झेलत वृत्तपत्र विक्रेते निभावतात रोजचे कर्तव्य

ऊन, पाऊस झेलत वृत्तपत्र विक्रेते निभावतात रोजचे कर्तव्य

Subscribe

वृत्तपत्र विक्रेता दिन ‘कोरोना’ची झळा आजही

नाशिक : पावसाळा असो की हिवाळा त्यानुसार ऋतुमानात बदल होत जातो. पण, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दिनचर्येत कोणताही बदल होत नाही. कोरोनाच्या संकट काळातही सर्वजण घरात बंदिस्त झालेले असताना वृत्तपत्र विक्रेते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत होते. भल्या पहाटे उठून वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असेल किंवा पूर्व नियोजित जागेवर सर्वजण ठरलेल्या वेळी जमतात. वृत्तपत्र घेवून गाडी दाखल झाली की त्यावर विक्रेत्यांच्या एकच उड्या पडतात. नियमितपणे हा शिरस्ता जपणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांचा यथोचित सन्माण करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑक्टोबर होय. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा होत आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा आमच्या कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. शहरात जवळपास 700 वृत्तपत्र विक्रेते आहेत. जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची संख्या 400 हून अधिक आहे. इमानेइतबारे व्यवसाय करणारा हा घटक तसा उपेक्षित राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. काही जणांची तिसरी, दुसरी पिढी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात आहेत. वडील, मुलगा आणि नातवंडे असे तीन पिढ्या या व्यवसायात आहेत. शहरात गेल्या 20 वर्षांपासून पायी वृत्तपत्राचे वाटप करणारे दत्तात्रय दाणी हे उत्कृष्ट कवी देखील आहेत. वृत्तपत्र वाटपासोबत वाचणाची आवड जोपासत त्यांनी आपल्यातील कवी जागृत केला. असंख्य विषयांवर कविता लिहिणारे दाणी यांच्या काही कविता तर तोंडपाठ झालेल्या आहेत.

- Advertisement -

या क्षेत्रातील हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. या व्यावसायात प्रामाणिकपणे काम करुन नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे खजिनदार वसंत घोडे, माजी अध्यक्ष किशोर सोनवणे, सोमनाथ माळवे, उत्तम गांगुडे, सुनिल मगर, राजू मगर, किरण ठोसर, डॉ.वाघ, इस्माइल पठाण सिडकोतील दत्तात्रय ठाकरे, महेंद्र भांड, पी. के. परदेशी, बी. पी. चौधरी, हरिदास भालके, सुनील जाधव, सातपूरचे सुभाषचंद्र कटारिया, दिलीप कटारिया, नाना पावशे, राजकुमार कायस्त, संदीप शेवाळे, सुरेश भांड, सी. बी. वाघ, एमजी रोडवरील प्रताप देशमुख, रमेश महाले, नाना पत्की, सुनील बुनगे, रवीराज खैरनार, अनिल निंबाळकर, भास्कर निंबाळकर यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी प्रदीर्घ काळापासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय जोपासला.

वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्माणाची वागणूक मिळायला हवी. प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीपेक्षा वाचकांनी नियमितपणे वृत्तपत्र विकत घेतले पाहिजे. या व्यवसायात नवीन पिढी येण्यास तयार होत नाही. ज्या व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत आहे, त्यांच्या कष्टांची जाणिव आपण ठेवली पाहिजे.

                                                        – चंद्रकांत पवार, अध्यक्ष, शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना

 

कोरोना काळात बंद केलेले वृत्तपत्र आता पुन्हा सुरु व्हायला हवेत. त्यावर वृत्तपत्र विक्रेत्यांचा व्यवसाय अवलंबून आहे. विक्रेत्यांना यापेक्षा वेगळ्या मदतीची अपेक्षा नाही. डिजिटल युगापेक्षा प्रत्यक्ष पेपर वाचण्याची मजा काही वेगळीच असते.
              – देवदत्त जोशी, संचालक, प्रसाद वृत्तपत्र एजन्सी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -