घरमहाराष्ट्रनाशिकप्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या वतीने क्रीडा स्पर्धांमधील गुणवंतांचा गौरव

प्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या वतीने क्रीडा स्पर्धांमधील गुणवंतांचा गौरव

Subscribe

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमात महापालिकेच्या वतीने भारतीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना व संघांना  महापौर भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते सलीम शेख, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, सभापती सुनीता पिंगळे, सुमन भालेराव, नगरसेवक चंद्रकांत खोडे, स्वाती भामरे आदींच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

- Advertisement -

कार्यक्रमाला उपायुक्त महेश बच्छाव, आर. एम. बहिरम, महेशकुमार डोईफोडे, शिवाजी आमले, शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे, नगररचना सहायक संचालक सुरेश निकुंभे, सहाय्यक आयुक्त अशोक वाघ, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, रामसिंग गांगुर्डे, नितीन वंजारी, बाजीराव माळी, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे, क्रीडा अधिकारी महेंद्र पगारे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील, उपमुख्यलेखापरीक्षक प्रतिभा मोरे, आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, अग्निशमन दल प्रमुख एस. के. बैरागी, सुरक्षा अधिकारी मधुकर शिंदे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, दिलीप राऊत, ज्ञानेश्वर पिंगळे यांच्सयासह र्व विभागीय अधिकारी, खातेप्रमुख,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पाथर्डी गावातील मनपा शाळा क्रमांक ८६ च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. सूत्रसंचालन गोपिनाथ हिवाळे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -