घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरातील पर्यटनस्थळांवर आता ‘नो सेल्फी झोन’

नाशिक शहरातील पर्यटनस्थळांवर आता ‘नो सेल्फी झोन’

Subscribe

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उचलले पाऊल

नाशिक :पर्यटननगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये पावसाळी पर्यटनानिमित्त पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी सेल्फी काढताना दुर्घटना घडू नयेत, यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जीवघेण्या सेल्फीला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणे ‘नो सेल्फी झोन’ म्हणून निश्चित करणार आहे.

जिल्हा प्रशासनाने यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ ची अंमलबजावणी सुरू केली आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसाळ्यात शहरातील सोमेश्वर धबधबा, नांदूर मधमेश्वर बंधारा व इतर पर्यटनस्थळी ‘नो सेल्फी झोन’ जाहीर करण्याबाबत पोलीस यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

तसेच, पर्यटनस्थळी होणार्‍या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करणे व आराखडा तयार करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे रस्ता खचणे, दरड कोसळणे, पाझर तलाव गळती, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, पूर पाहण्यासाठी गर्दी, इमारत कोसळणे इ. संभाव्य घटनाप्रसंगी गर्दी नियंत्रणासाठी मनुष्यबळ तैनात करण्यात यावे. तसेच, पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांची आणि भाविकांची माहिती नियंत्रण कक्षाला उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला नोंद ठेवण्यात यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळविल्यानुसार, चोवीस तास आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू ठेवून त्यात सक्षम कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावयाची आहे. नियुक्त कर्मचार्‍यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात यावे. दूरध्वनी, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, फॅक्स, इंटरनेट, प्रिंटर्स, संगणक व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा, जीवनरक्षकांची यादी, पोहणारे, गिर्यारोधक, पक्षी मित्र, सर्पमित्र यांची दूरध्वनी यादी अद्यावत ठेवण्यात यावी. यासोबतच आपत्ती प्रवण क्षेत्राचा नकाशा यांसह स्थापित नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवण्याबाबत सूचित केले आहे.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -