घरमहाराष्ट्रनाशिकरविवारीच पाणी भरुन ठेवा; सोमवारी पाणी येणार नाही

रविवारीच पाणी भरुन ठेवा; सोमवारी पाणी येणार नाही

Subscribe

दुरुस्तीच्या कामांमुळे गंगापूर, चेहडी आणि मुकणे धरण पंपींग स्टेशन परिसरातील वीज पुरवठा येत्या सोमवारी (दि.१३) बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात सोमवारी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे मंगळवारीही (दि.१४) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथील 3.3 केव्ही केबलची फिडरला जोडणी करणे, पाथर्डी फाटा येथील क्रॉस कनेक्शनचे काम करणे, बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र 3 लक्ष गॅलन टाकीचा इनलेट पाईपवरील लिकेज दुरुस्ती, सबस्टेशन येथील सीटीपीटी बसविणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथील सेकंड फेज फिल्टर बॅकवॉश व्हॉल दुरुस्ती करणे, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील क्लॅरीफायर लिकेज दुरुस्ती करणे, नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशन पीटी बदलणे, पंपहाऊस मधील मेन पॅनलची केबल नवीन लग भरुन जोडणे, गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथील वॉश वॉटर पंपाची पाईपलाईन दुरुस्ती व चेहेडी पंपींग स्टेशन येथील चेंज ओव्हर पॅनल बदलणे व इलेक्ट्रिसिटी चार्जिंग करुन ट्रायल घेणे, तसेच विदयुत विभागाचे एल.टी लाईन उभारणी करणे  ही कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गंगापूर धरण, चेहेडी पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथील वीज पुरवठा सोमवारी (दि.१३) बंद ठेवावा लागणार आहे.  परिणामी संपूर्ण नाशिक शहरात सोमवारी  सकाळी 9वाजेपासून संपूर्ण दिवसभर व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.  तसेच मंगळवारी (दि. १४) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -