घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआता दररोज १० हजार स्वॅब टेस्टिंग

आता दररोज १० हजार स्वॅब टेस्टिंग

Subscribe

कोरोना संशयित रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पुणे व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले जात असून अहवालप्राप्त होण्यास विलंब होत आहे. मात्र जिल्हयातील कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ बघता नाशिक जिल्हा रूग्णालय आणि महापालिकेच्या बिटको रूग्णालयात प्रत्येक पाच हजार स्वॅब टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता यंत्रसामुग्री बसविण्यात येत असून मार्च अखेर नाशिकमध्येच स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. सध्या नाशिकमध्ये दररोज हजार ते तेराशे कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहे. याकरीता आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केला असून स्वॅब टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु स्वॅब टेस्टिंगला असलेल्या मर्यादा लक्षात घेता आता जिल्हा रूग्णालय आणि बिटको रूग्णालयात नविन यंत्रसामुग्री बसविण्यात येत आहे.

- Advertisement -

सध्या लॅब उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून नाशिकमधील रुग्णांच्या स्वॅबची आपल्याच जिल्ह्यात चाचणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या दोन लॅबमधून दररोज दहा हजार स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -