घरमहाराष्ट्रनाशिक१४ महिन्यांत शहरात सुमारे २० हजार जणांवर अंत्यसंस्कार

१४ महिन्यांत शहरात सुमारे २० हजार जणांवर अंत्यसंस्कार

Subscribe

पाच हजार ६९ टन लाकडाचा जाळण्यासाठी वापर

कोरोना काळात झालेल्या मृत्यूंबाबत अद्यापही संभ्रम असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या एका अहवालानुसार गेल्या १४ महिन्यात शहरात तब्बल पाच हजार ६९ टन लाकूड जाळण्यात आले आहे. शहरातील १७ स्मशानभूमींमधील ही आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार शहरात २० हजार जणांवर या १४ महिन्यांत अंत्यसंस्कार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे ज्या महिन्यात कोरोनाने हाहा:कार उडवला होता त्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक एक हजार ३०२ टन लाकूड अमरधाममध्ये जाळण्यात आले आहे.

आतापर्यंत शहरातील दोन लाख २६ हजार जणांना करोनाची बाधा झालेली आहे. यामध्ये पहिल्या लाटेतील करोनाबाधितांचा आकडा सुमारे ७६ हजार, तर दुसर्‍या लाटेत दीड लाख बाधित झाले होते. करोनाच्या दुसर्‍या लाटेत बळीची संख्या अधिक वाढली होती. अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमींमध्ये मृतदेहदेखील वेटिंगवर असल्याचे दुर्दैवी चित्र नाशिक शहरात दिसून आले. करोनामुळे महापालिका हद्दीत तीन हजार ७२० जणांचा बळी गेल्याचा आकडा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असला, तरी शासनाच्या पोर्टलवर खासगी रुग्णालयांकडून विलंबाने भरली जाणारी करोनाबळींचा आकडेवारी पाहता बळींबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. त्यातच शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी लागणार्‍या आकडेवारीमुळे संशय अधिक बळावला आहे. एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारांसाठी झालेल्या तब्बल पाच हजार ६९ टन लाकडांचा वापर मृतांच्या आकड्याबाबत स्पष्टता देतो.

- Advertisement -

  असे आहे गणित –

मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी चार ते आठ मण लाकडाचा वापर केला जातो. चार मण लाकडे लहान मुलांसाठी, तर आठ मण लाकडे वयस्कर मृतदेहाकरिता वापरली जातात. एका मणमध्ये ४० किलो, तर एक टन मध्ये १००० किलो असा विचार केला, तर एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत सुमारे २० हजारांच्या जवळपास मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले असावेत, असा अंदाज आहे.

Table

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -