घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मुंबई महामार्गावर अपघात

नाशिक मुंबई महामार्गावर अपघात

Subscribe

आडगाव जवळील अपघातात एक ठार

नाशिक मुंबई महामार्गावर भरधाव वेगाने आडगावकडून नाशिककडे येणाऱ्या मर्सिडीज वाहन (क्र. MH 15 FZ 3001) गाडीचे चाक लॉक झाल्याने घडलेल्या अपघातात वरुण साहेबराव गायकवाड (वय ३८) डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज (दि.६)दुपारी घडली.

varun gaikwad
मयत वरून गायकवाड

याबाबत अधिक माहिती अशी कि, आडगाव येथे महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकाजवळ गाडीचे चाक लॉक होऊन ती दुभाजकावर धडकली. गाडी भरधाव वेगाने जात असताना अचानक व्हील लॉक झाले त्यामुळे उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुभाजकाला धडक देत ती महामार्गाच्या सर्व्हिस रोड वर असलेल्या एका शेड मध्ये जाऊन आदळली. यात वाहनचालक जागीच ठार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -