घरमहाराष्ट्रनाशिकराज्यात फक्त ६०० मॉल्सचालकांना वाईन विक्री करता येणार

राज्यात फक्त ६०० मॉल्सचालकांना वाईन विक्री करता येणार

Subscribe

राज्यात १ हजार स्क्वेअर फुटाची फक्त ६०० दुकाने

नाशिक : राज्य सरकारने शॉपिंग सेंटर व मॉल्समध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर राज्यातील फक्त 600 मॉल्सचालकांना या निर्णयाचा लाभ घेता येेणार आहे. त्यामुळे किराणा दुकान किंवा रेशन दुकानात वाईन विक्री होणार असल्याच्या नावाखाली वाईन निर्माते व द्राक्ष उत्पादकांची बदनामी थांबवावी, असे आवाहन ऑल इंडिया वाईन असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर व द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास भोसले पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केले.

देशात 88 लाख लिटर दारुची विक्री होते. यात 30 कोटी बिअर, 22 कोटी लिकरची तर 36 कोटी लिटर देशीदारुची आणि वाईनची अवघे 75 लाख लिटर विक्री होते. देशात 90 वाईनरीचे प्रकल्प आहेत. यात महाराष्ट्रात 70 प्रकल्पांमध्ये वाईनचे उत्पादन होते. विशेष म्हणजे नाशिकमध्ये सर्वाधिक वाईनरी असल्या तरी विक्री होत नसल्याने बहुतांश वायनरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय वाईनरी उद्योगाला चालना देणारा आहे. महाराष्ट्राने वाईनरी विक्रीला प्रोत्साहन दिले नाही तर, फ्रान्स, इटली व स्पेनमधील वाईन्स आपल्या देशात विक्रीला सहज उपलब्ध होतील.

- Advertisement -

विदेशी मद्याप्रमाणेच वाईनही विदेशी प्यावी लागेल. ज्या उद्योगातून द्राक्ष उत्पादकांना तब्बल 80 टक्के पैसे मिळतात तो वाईनरीचा उद्योग अडचणीत सापडला आहे. देशभरात 4 लाख एकरवर द्राक्षाचे उत्पादन होते. मात्र, वाईनरीचे प्रमाण कमी असल्यामुळे निर्यातीवर शेतकर्‍यांना विसंबून रहावे लागते. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना थेट लाभ होईल, असेही होळकर व भोसले यांनी सांगितले. वाईनरीसोबत कृषी पर्यटनाचाही विकास होणार असल्याने विदेशी चलनही उपलब्ध होण्यास मदत मिळेल. प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकरी शेती करत आहे.

त्यांना उत्पादन खर्चही पदरात पडत नाही. त्यामुळे 20 वर्षांपासून व्यावसाय करणार्‍या वाईन उत्पादकांविषयी अपप्रचार थांबवण्याचे आवाहनही त्यांनी राजकारण्यांना केले. नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचे किरण चव्हाण, महेंद्र भामरे, संजय कोटेकर, रवींद्र निमसे, विजय घुमरे,सदाशिव नाठे यांनी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -