घरमहाराष्ट्रनाशिकवर्‍हाडावर काळाचा घाला; ट्रकच्या अपघातात पाच ठार, २२ जखमी

वर्‍हाडावर काळाचा घाला; ट्रकच्या अपघातात पाच ठार, २२ जखमी

Subscribe

विवाह आटोपून येताना वैजापूरजवळ अपघात

नाशिक : अंबड परिसरातील चुंचाळे घरकुल वसाहतीतील मोरे कुटुंबियांच्या लग्नाच्या वर्‍हाडाला सोमवारी (दि.३१) भीषण अपघात झाला. या अपघातात नवरदेवाच्या वडिलांसह पाचजणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. मोरे कुटुंबिय जालना येथून विवाह आटपून नाशिकला परत येताना वर्‍हाडाच्या आयशर गाडीला वैजापूर येथील शिवराई फाट्याजवळ पहाटे ३.३० वाजता अपघात झाला. जखमींना वैजापूर व नाशिक येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी व मृत व्यक्ती घरकूल व गौतम नगरमधील रहिवासी आहेत.

आयशर ट्रकमधून वर्‍हाड औरंगाबादहुन नाशिककडे निघाले होते. ट्रकमध्ये एकूण ३५ व्यक्ती होते. ट्रक सोमवारी पहाटे शिवराई गावाजवळ येताच समोरून येणार्‍या ट्रकचा आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यात सुरुवातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात २२ जण जखमी झाले. नवरदेवाचे वडील पंडित मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. किरकोळ जखमी रुग्णांवर वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींवर औरंगाबाद आणि नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अशी आहेत मृतांची नावे

- Advertisement -

नवरदेवाचे वडील पंडित मोरे, कविता मोरे (वय ४५, सर्वजण रा.अंबड, नाशिक), प्रज्ञा गायकवाड (१५), मोनू वावळे (९), ललिता पवार (४८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -