घरमहाराष्ट्रनाशिकसाडेसहा हजार मंडप व्यावसायिक, ५० हजार कामगारांची होरपळ

साडेसहा हजार मंडप व्यावसायिक, ५० हजार कामगारांची होरपळ

Subscribe

लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आल्याने जिल्हयातील सुमारे साडेसहा हजार मंडप व्यावसायिक आणि त्यांना पूरक मंडप डेकोरेटर्सवरील ५० ते ६० हजार कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. मंडप व्यवसायाची शासनाने योग्य दखल घेऊन होरपळ कशी थांबेल हे बघितले पाहिजे, असे मत मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी केली आहे.

मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने ऐन लग्नसराईच्या काळातील सर्व ऑर्डर्स रदद कराव्या लागल्या. कोरोना महामारीमुळे सर्व कामे रदद होउन घेतलेली अ‍ॅडव्हान्स रक्कमही परत देण्यात आली. अशा परिस्थितीत वेगवेगळे कर भरणे आणि कामगारांना पगार देणे अतिशय कठिण होउन बसले आहे. नाशिक जिल्हयात साडेसहा हजाराहून अधिक मंडप व्यावसायिक आहेत. तसेच या व्यावसायामध्ये मनुष्यबळाची मोठया प्रमाणात आवश्यकता भासत असल्यामुळे कामागर संख्याही मोठया प्रमाणात आहे. आजमितीस जिल्हयातील छोटया मोठया अशा सर्व प्रकारच्या मंडप डोकोरेटर्सकडील कामागर संख्या ही अंदाजे ५० ते ६० हजाराहून अधिक आहे. मार्च ते जून हा कालावधी विवाह सोहळे, समारंभांचा असतो आता हा सिझन तर हाताचा गेला त्यामुळे दिवाळीनंतर होणारया सोहळयांवरच या व्यावसायाची भिस्त अवलंबुन आहे. हा हंगाम जर हातचा निघून गेला तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

निर्बंध शिथिल करण्याची मागणी

कोरोनामुळे ठरलेले विवाह सोहळे काही यजमानांनी रदद केले असले तरी, लॉकडाउन शिथील केल्यानंतर घरघुती पध्दतीने सोहळा आयोजित करून विवाह उरकण्याची तयारी अनेकजण करीत आहेत. घरातील मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत लॉकडाउननंतर लग्न उरकण्याचा मनसुबा रचला जात आहे. आता दिवाळीनंतर पुन्हा लग्न सराईचा सिझन सुरू होणार असून निदान व्यावयायिकांना उभारी देण्यासाठी शासनाने निर्बंध शिथील करण्याची मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.

कर्जबाजारीपणाची वेळ

या व्यवसायात लाखोंची गुंतवणुक केली आहे मात्र मार्च ते जून या कालावधीत सर्व समारंभ रदद करण्यात आले मात्र व्यावसायिकांना बँकांचे हप्ते मात्र भरावे लागत आहे. अनेकांवर कर्जबाजारीपणाची वेळ आली असून आर्थिक बजेट पुर्णतः कोलमडले आहे. सध्या पन्नास लोकांच्या उपस्थितीत सोहळयांना परवानगी असली तरी, व्यावसायिकांना मात्र हे परडवणारे नाही त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घेउन संबधित सर्व व्यावसायिकांना आधार द्यावा. दिलीप सोनवणे, मंडप व्यावसायिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -