घरमहाराष्ट्रनाशिकपाडव्याचा ‘आनंदाचा शिधा’ हुकला आता आंबेडकर जयंतीकडे लक्ष; जिल्ह्यात रवा, साखर दाखल

पाडव्याचा ‘आनंदाचा शिधा’ हुकला आता आंबेडकर जयंतीकडे लक्ष; जिल्ह्यात रवा, साखर दाखल

Subscribe

नाशिक : सर्वसामान्य कुटुंबाचा पाडवा गोड करण्यासाठी शासनाने गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त दिवाळीच्या धर्तीवर आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. मात्र शिधा वेळेवर पोहचू न शकल्याने पाडवा होऊनही नागरिकांना गोडधोड करून खाता आले नाही. त्यामुळे पाडव्याचा आनंद हुकला. आता निदान येत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला घरोघरी गोडधोड होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत रवा अन् साखर पोहचली असून लवकरच संपूर्ण किटही उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे 7 लाख 82 हजार 562 शिधा जिन्नस संच पुरविले जाणार आहेत. मात्र किट वेळेवर न आल्याने कुटुंबीयाच्या पदरी धान्याऐवजी निराशा आली. मात्र आंबेडकर जयंतीपर्यत घरोघरी किट वाटप केले जाणार आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात रवा आणि साखर पोहचली असून लवकरच पामतेल, चणाडाळ हे साहित्य पोहचणार आहे. त्यामुळे हे किट आल्यानंतर लागलीच वाटपाला सुरवात होणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगणत आले. सवलतीच्या दरात हा आनंदाचा शिधा ई-पॉस यंत्राच्या प्रणालीद्वारे वाटप करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाने निविदा प्रक्रिया राबविण्यासदेखील मान्यता दिली. त्याचा कालावधी पंधरा दिवस 21 दिवसांचा करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र,  गुढीपाडव्याचा टप्पा तर हुकला आहे, आता आंबेडकर जयंतीची नागरिकांना आस लागली आहे. सरकारने वेळेवर शिधा संच एकत्रीतपणे उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून लाभार्थी, दुकानदारांची गैरसोय होणार नाही. आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे मार्चअखेर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा वाटप आंबेडकर जयंतीपूर्वी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -