घरताज्या घडामोडीपेट्रोलपंपाच्या गोडावूनमधून ऑईलचे डबे लंपास

पेट्रोलपंपाच्या गोडावूनमधून ऑईलचे डबे लंपास

Subscribe

पेट्रोलपंपाच्या गोडावूनमधून चोरट्यानी ऑईलचे डबे, संगणक, बॅटऱ्या लंपास केल्याची घटना फुलेनगर, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी दत्तात्रय आहेर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित राकेश गुंजाळ, संदीप घुले, अनिकेत शिंदे, विक्रम डुकरे (सर्वजण रा.रामवाडी, पंचवटी), हरिओम चव्हाण (रा.फुलेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पेठ रोडवरील पेट्रोल पंपाचे बंद असलेल्या गोडावूनच्या दरवाजाचे कुलूप तोडून पाचजणांनी आत प्रवेश केला. गोडावूनमधील ऑईलचे डबे, संगणक, टी पॉय, 8 बॅटरी लंपास केल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळवे करत आहेत.

भद्रकाली परिसरात घरफोडी

घरमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने घरफोडी केल्याची घटना भद्रकालीत घडली. याप्रकरणी हबीब मलिक ऊर्फ मीना बाप्पा यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हबीब मलिक यांच्या गैरहजेरीत चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी, कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, रोकड लंपास केली. ते घरी आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार डी.बी.मोहिते करत आहेत.

- Advertisement -

कामगाराने मारला लॅपटॉपवर डल्ला

बिगारी कामगाराने घरमालकाकडून चावी घेत घरात ठेवलेला लॅपटॉप लंपास केल्याची घटना आस्ता अपार्टमेंट, नवश्या गणपती मंदिराजवळ घडली. याप्रकरणी घरमालकिणीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बिगारी कामगाराने घरमालकाकडून दुचाकीची चावी घेतली. त्यानंतर त्याने दुचाकीच्या डिकीत ठेवलेली घराची चावी घेतले. घरमालकाच्या गैरहजेरीत त्याने घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील लॅपटॉप लंपास केला. घरमालक घरी आला असता कामगारानेच लॅपटॉप लंपास केल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत.

रिक्षा पलटी झाल्याने रिक्षाचालक ठार 

भरधाव रिक्षा पलटी झाल्याने रिक्षाचालक ठार झाल्याची घटना सिन्नर फाटा ते एकलहरे रोडदरम्यान घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रकाश रामनाथ ढेरिंग (35, रा.पळसे) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश ढेरिंग सिन्नर फाटा ते एकलहरे रोडने रिक्षा घेवून जात होते. मंगेश मोटर गॅरेजसमोर रिक्षा पलटी असता ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. पी. उजागरे करत आहेत

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -