घरमहाराष्ट्रनाशिकसिंहस्थ कुंभमेळयाचे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू

सिंहस्थ कुंभमेळयाचे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू

Subscribe

नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याला पाच वर्षांचा कार्यकाळ असला तरी प्रशासकीय पातळीवर आत्तापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी येत्या वर्षाअखेरपर्यंत कुंभमेळयाचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कुंभमेळा नियोजनाचा अभ्यास सुरू केला आहे.

नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भव्य स्वरूपात सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होते. या काळात शाही स्नानाची पर्वणी असते म्हणून जगभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. प्रशासनाला विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी नेमका किती निधी आवश्यक आहे. याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. आढावा घेण्यात आल्यानंतर शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्यावतीने यापूर्वीच कुंभमेळा तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळयाचे आयोजन होत असल्याने शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात तर त्र्यंबकेश्वरमध्ये जिल्हा प्रशासनाच्यामार्फत सुविधा पुरविल्या जातात. या अनुषंगाने गत सिंहस्थ कुंभमेळयात करण्यात आलेल्या नियोजनाचा अभ्यास जिल्हाधिकार्‍यांमार्फत करण्यात येत आहे. गत कुंभमेळयात सुमारे 1700 एकर जागेचे तात्पुरते संपादन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पोलिस यंत्रणेकडून आराखडा तयार केला होता.

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार लवकरच सर्व लोक प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असून २०२७ मध्ये आयोजीत सिंहस्थ कुंभमेळयाच्या अनुषंगाने त्यांच्या सुचना मागविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळयातील विविध आखाडयांसाठी जागा संपादन, वाहतुक व्यवस्था, भाविकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्याबाबत अभ्यास करण्यात येणार असून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. : गंगाथरन डी. जिल्हाधिकारी

- Advertisement -
मागील अनुभवांचा अभ्यास

गत कुंभमेळयात सुमारे १ हजार कोटी रूपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला होता. विविध विभागांकडून प्राप्त प्रस्तावानुसार या निधीचे वितरण करण्यात येउन कामे करण्यात आली. त्यानूसार कोणत्या विभागाने कुंभमेळयाच्या पार्श्वभुमीवर कोणती कामे करण्यात आली. या कामांची सद्यस्थिती व नव्याने करावयाची कामे याचा अभ्यास देखील प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -