घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस असल्याची बतावणी करत सात तोळे सोन्यावर मारला डल्ला

पोलीस असल्याची बतावणी करत सात तोळे सोन्यावर मारला डल्ला

Subscribe

दोन लुटारूंनी श्रीराम नगर येथील महिलेचे ७२ ग्राम वजनाचे दागिने हातोहात केले लंपास

 पोलीस असल्याची बतावणी करत दोन लुटारूंनी श्रीराम नगर येथील महिलेचे ७२ ग्राम वजनाचे दागिने हातोहात लंपास केले. कोटमगाव रोडवरील जाधव गॅस एजन्सी समोर सकाळी १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत लासलगाव पोलिसांत सुलोचना विजय कोचर यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत लासलगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुलोचना कोचर या कामानिमित्त कोटमगाव रोडवरील जाधव गॅस एजन्सीच्या समोरुन जात असताना दोन इस्मानी या महिलेस थांबवत पोलीस असल्याची बतावणी करत तुम्ही एवढे दागिने घालून फिरता कशाला, तुम्ही टिव्ही पाहत नाही का असे धमकावत फिर्यादी कोचर यांच्या जवळ असलेल्या ३ बांगड्या, मंगळसूत्र असा ७२ ग्राम वजनाच्या सोन्याच्या वस्तू पिशवीत ठेवण्यास सांगत पिशवी त्यांच्या ताब्यात घेत फसवणूक करत पोबारा केला. महिलेने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत या चोरट्यांनी येथून पळ काढला. अत्यंत गजबजलेल्या परिसरात घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सपोउनी आर. एस. जोपुळे, सपोउनी देविदास लाड, कैलास महाजन, प्रदीप अजगे, वाडीलाल जाधक, गणेश बागुल पुढील तपास करत आहे.

निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे व पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके या दोघे अज्ञात चोरट्यांच्या तपासासाठी रवाना केल्या असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. लाड करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -