घरमहाराष्ट्रनाशिकVideo | काळे फुगे सोडून मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीकडून निषेध

Video | काळे फुगे सोडून मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीकडून निषेध

Subscribe

सोबतच इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच स्थानबद्ध करण्यात आले होते.

नाशिक : मु्ख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा बुधवारी (दि.१८) नाशिकमध्ये रोड शो सुरू असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुंबईनाका परिसरात काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांचा ताफा महाजनादेश यात्रेच्या सुरक्षेत गुंतलेला असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रोड शोच्या मार्गापासून दूरवर मुंबई नाक्यावर आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने महाजनादेश यात्रेला दाखवले काळे फुगे-झेंडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये पोहोचताच राष्ट्रवादीने काळे फुगे आणि झेंडे दाखवत निदर्शने केली.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 18, 2019

- Advertisement -

मुंबई नाका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईनाका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे फुगे व फलक घेऊन घोषणाबाजी केली. फलकावर पक्षात येता का ईडी पाठवू, असे लिहिलेले होते. यावेळी रवींद्र शिंदे, सुरेखा निमसे, सायरा शेख, मेघा दराडे, संदीप गोतराने, निखील भागवत, किरण जगझाप आदी उपस्थित होते.

छात्रभारती संघटनेने दाखवले निषेधाचे फलक

महाजनादेश यात्रेदरम्यान छात्रभारती संघटनेने नाशिक जिल्हा परिषद समोर निषेधाचे फलक दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी 3 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

सकाळपासूनच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले होते ताब्यात

महाजनदेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू झालेली आहे. तर काही आंदोलकांना पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातच स्थानबद्ध केलेले आहे. स्थानबद्धतेत प्रमुख्यने डी एल कराड यांचा समावेश आहे तर मनसे कामगार सेनवचे शहर चिटणीस यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सूचना देऊन सोडून दिले आहे. काँग्रेसचे ज्ञानेश्वर काळे,ज्ञानेश्वर काळे,अशोक शेंडगे (काँग्रेस) यांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना हंसराज वडघुले , प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे , स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव , शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कैलास खांडबहाले , स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक तालुकाध्यक्ष रतन रतन , आम आदमी युवा आघाडी उ. म. प्रमुख स्वप्निल घिया , आम आदमी युवा जिल्हाध्यक्ष योगेश कापसे , संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रफुल वाघ , संभाजी ब्रिगेड जिल्हा सरचिटणीस विकी गायधनी , सामाजिक कार्यकर्ते पद्माकर इंगळे , आपले पर्यावरण संस्था सचिन तुपे या सर्व पदाधिकाऱ्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन याठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -