घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररक्षणकर्त्यांसमवेत रक्षाबंधन; पोलिसांनी ओवाळणीत दिले राष्ट्रध्वज

रक्षणकर्त्यांसमवेत रक्षाबंधन; पोलिसांनी ओवाळणीत दिले राष्ट्रध्वज

Subscribe

मनमाड : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा प्रतीक असलेला रक्षा बंधन गुरुवारी (दि. १२) मनमाड शहर परिसरासोबत ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला असून, कोरोनामुळे दोन वर्षा नंतर रक्षाबंधन साजरा करण्याची भाऊ-बहिणींना संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना. तिकडे महिला भगिणींनी पोलीस अधिकार्‍यांना राखी बांधून त्यांच्याकडून रक्षण करण्याचे वचन घेतले तर पोलिसांनी बहिणींना ओवाळणीत राष्ट्रध्वज भेट म्हणून दिले. अनेक मुस्लीम तरुणींनी हिंदू भावना तर हिंदू भगिणींनी मुस्लीम बांधवाना राखी बांधून राष्ट्रीय एकात्मतेचा केवळ संदेशच दिला नाही तर जातीयवाद निर्माण करणार्‍यांना देखील चोख उत्तर दिले.

बहिण-भावाच्या अतूट प्रेम आणि नात्याचे प्रतिक मानला जाणार्‍या रक्षा बंधनाची सर्वच भाऊ-बहिणी आतुरतेने वाट पाहतात. मात्र कोरोनामुळे दोन वर्ष सर्वच सण,उत्सवावर निर्बंध आले होते आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे केले जात आहे.रक्षा बंधन देखील उत्साहात साजरा करण्यात आला असून यानिमित्त बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधली तर भावांनी देखील त्यांना प्रेमाची भेट दिली. वंचित बहुजन पार्टीच्या अध्यक्षा अ‍ॅड. आम्रपाली निकम यांच्यासह इतर महिलांनी पोलीस स्थानकात येऊन सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गिते आणि इतर अधिकारी पोलीस कर्मचार्‍यांना राखी बांधत त्यांच्याकडून रक्षण करण्याचे वचन घेतले तर पोलीस बांधवानी या बहिणींना ओवाळणीची भेट म्हणून राष्ट्रध्वज दिले. एकीकडे जाती-जातीत भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना दुसरीकडे मात्र अनेक मुस्लीम बहिणींनी हिंदू भावांना तर हिंदू बहिणींनी त्यांच्या मुस्लीम भावांना राखी बांधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्या बरोबरच जातियवाद निर्माण करणार्‍यांना देखील चोख उत्तर दिले.

- Advertisement -

दरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एकत्मता चौक या मुख्य बाजारपेठे सोबत इतर वेगवेगळ्या भागांत राखीची दुकाने सजली होती. आपल्या लाडक्या भावांसाठी चांगलीत चांगली राखी घेण्यासाठी भगिणींची झुंबड उडाली होती. यावर्षी राख्यांच्या भावात 15 ते 20 टक्के वाढ झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -