घरमहाराष्ट्रनाशिकचोरीला गेलेल्या टोकाडेच्या रस्त्यावरून जिल्हा परिषदेत रणकंदन

चोरीला गेलेल्या टोकाडेच्या रस्त्यावरून जिल्हा परिषदेत रणकंदन

Subscribe

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात 18 लाख रूपयांचा रस्ता चोरीला गेल्यानंतर त्यावरुन अधिकारी व तक्रारदार यांच्यात रणकंदन सुरु झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी केलेल्या पाहणीत 15 व्या वित्त आयोगातून करण्यात आलेला शिवरस्ता दाखविण्यात आला आहे. हा रस्ता देखील गावअतंर्गत नसून एका खाजगी शेतात तयार करण्यात आलेले असल्याचे समोर आले आहे. तर, रस्ता अस्तित्वात असल्याचे कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे रस्तांचा गुंता वाढत चालला आहे.

दरम्यान, विठोबा द्यानदान यांनी गुरूवारी (ता.19) जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेतली. यात, द्यानद्यान यांनी रस्त्यां सदर्भात असलेले वास्तव मांडत, रस्ताच अस्तित्वात नसल्याचे सांगितले. मित्तल यांनी द्यानद्यान याची बाजू ऐकूण घेत, कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील रस्त्यांबाबत विठोबा द्यानदान यांनी रस्ता चोरीला गेला असल्याची तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीची तब्बल सात महिन्यांनी जिल्हा परिषदेने दखल घेत बुधवारी (दि. 18) कार्यकारी अभियंता संजय नारखेडे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली. यात, कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी संबंधित गावाबाहेर रस्ता अस्तित्वात असून, तलाव, शिवार रस्ता तोच आहे. 400 मीटरचा हा रस्ता आहे, त्यावर मुरूम तर कुठे बांधकाम, सोलिंग आहे. गावांतर्गत रस्ता असल्याने तो गावात रस्ता असावा अशी तक्रारदारांची मागणी असल्याचे नारखेडे यांनी सांगितले.

- Advertisement -

दुसरीकडे कार्यकारी अभिंयता यांना तेथील प्रशासनाने शिवरस्ता दाखवित त्यांची दिशाभूल केली आहे. रस्त्यांबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली असता, 15 व्या वित्त आयोगातूनच रस्ता नसल्याचे लेखी दिले होते. आता 15 व्या वित्त आयोगातूनच हा शिवरस्ता तयार केला असल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगितले जात असल्याचे द्यानद्यान यांनी सांगितले. वास्तविक, 15 व्या वित्त आयोगातून या रस्त्यांसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली असल्यास ती जागा ग्रामपंचायतींच्या मालकीची असणे आवश्यक होती. मात्र, यात काहीही दिसत नसल्याने, या रस्त्याचा पेच वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -