घरमहाराष्ट्रनाशिकदिव्यांग, अपंगांसह ज्येष्ठ मतदारांचा उत्स्फूर्त पुढाकार

दिव्यांग, अपंगांसह ज्येष्ठ मतदारांचा उत्स्फूर्त पुढाकार

Subscribe

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धडधाकट नागरिकांसह दिव्यांग, अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त पुढाकार लाभला.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धडधाकट नागरिकांसह दिव्यांग, अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फूर्त पुढाकार लाभला. एखाद्-दोन अपवाद वगळता अन्य सर्वच केंद्रांवर प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा दिव्यांग-अपंगांनी लाभ घेतला. कुणी काठीच्या, कुणी व्हील चेअर, तर कुणी कुटुंबीयांच्या आधाराने मतदान केंद्रांवर येत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद हा तरुणाईला लाजवेल असा होता. काही मतदान केंद्रांवरील पायऱ्या अडचणीच्या ठरत होत्या, तर काही ठिकाणी रॅम्पच्या व्यवस्थेचा अभाव दिसून आला. मात्र, अशाही स्थितीत दुपारी २ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवरील प्रतिसाद कायम होता.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -