घरदेश-विदेशमोदी, शहांच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या याचिकेवर होणार सुनावणी

मोदी, शहांच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या याचिकेवर होणार सुनावणी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष खासदार सुष्मिता देव यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यासंबंधीत सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयानी त्यांची याचिका स्विकारली असुन, याचिकेवर सुनावणी होणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष खासदार सुष्मिता देव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केला असल्याचे त्यांनी आरोप केला आहे. तर सुष्मिता यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सुष्मिता यांनी निवडणूक आयोगला २४ तासांच्या आता मोदी आणि शहांच्या विरोद्ध निर्णय घेण्यास सांगितले आहे. सुष्मिता यांची याचिका सर्वोच्च न्यायलयाने स्विकारली आहे. तर या याचिकेवर मंगळवार ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

याचिकेमध्ये काय?

सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष शहा यांनी वऱ्याचवेळा निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. मोदी, शहांच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या विरोधात काँग्रेस पक्षांनी सर्व पुरावे सादर केले आहेत. तसेच मोदी, शहांनी भडकपणांने भाषण करताना दिसले. तर भाषणातून त्यांनी सैनिकांच्या नावावर मत मागितली. त्यामुळे निवडणूक आयोग यांच्यावर प्रतिबंध लावा, असेही म्हटले आहे.

राहुल यांच्या विरोधात आयोगाकडे तक्रार

दरम्यान, आता भाजप पक्षानेही निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवीच्या कलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बद्दल असभ्य भाषा वापरली असल्याने त्यांच्या विरोधात सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -