घरमहाराष्ट्रनाशिकएस. के. पांडे विद्यालयाचा निकाल आनलाईन

एस. के. पांडे विद्यालयाचा निकाल आनलाईन

Subscribe

नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. पांडे विद्यालयात इयत्ता ८वी, ९वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आॅनलाईन जाहीर करण्यात आल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

लाॅकडाऊनच्या काळात शाळेत येऊन निकालासाठी गर्दी करणे योग्य नसल्याने विद्यार्थी व पालकांना घरबसल्या आनलाईन निकाल पाहता येणार आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर निकाल पहिल्यांदाच होत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ यांनी सांगितले, http://www.sgspm.com/vsoresult/srm/skp/skpanderesult.html या संकेतस्थळावरुन निकाल जाहीर करतांना सेक्रेटरी प्रवीण जोशी, खजिनदार मिलींद पांडे, यांच्यासह प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. संस्थेची आनलाईन प्रणाली विठ्ठल रहाणे यांनी तयार केली असून प्राचार्य मनोहर भोर, संदीप पांडे, धनंजय पाठक, आरती वाजे, भावसार सर आदी उपस्थित होत्या.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -