घरमहाराष्ट्रनाशिकया कारणांमुळे सातपूर कोरोनामुक्त !

या कारणांमुळे सातपूर कोरोनामुक्त !

Subscribe

लोकसहभाग, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत राबविल्या उपाययोजना

एखाद्या आपत्तीजन्य परिस्थितीत सामाजिक ताकद एकवटल्यास काय घडू शकते, याची प्रचिती सातपूर विभागात आली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र हाहाकार माजवला असताना सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत प्रभावी उपाययोजना आखल्या. परिणामी मंगळवारी (दि.८) सातपूर परिसर पूर्णत: कोरोनामुक्त झाला. महापालिकेच्या आकडेवारीच्या तक्त्यात सातपूरमध्ये मंगळवारी शून्य नवे रुग्ण दाखवण्यात आले आहेत.

कोरोना पहिल्या लाटेपेक्षा यंदाची दुसरी लाट सर्वात भयानक होती. यात जवळपास प्रत्येक घरात दस्तक दिली. या आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्रापासून ते गावपातळीपर्यत सर्वच यंत्रणांसमोर आव्हान उभे राहीले. राज्य शासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले जाऊ लागले. या लाटेत नाशिक जिल्हा देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. जिल्ह्यात बाधितांची संख्या ४६ हजारांवर जाऊन पोहचली. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन हा संसर्ग थोपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. परंतु नागरिकांच्या सहकार्याशिवाय संसर्गावर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवत विभाग कोरोनामुक्तीसाठी पुढाकार घेतला. शहरातील सहा विभागांपैकी सातपूर विभाग हा औद्योगिक वसाहत असलेला कामगार बहुल भाग आहे. रोजगारासाठी अनेक कुटुंब येथे स्थायिक झाले. अशात कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनासमोर आव्हान होते. परंतु कोरोना नियमांची आणि शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची येथे प्रभावी अंमलबजावणी झआली. परिणामी शहरात प्रत्येक विभागात कमी-अधिक प्रमाणात का होईना रुग्ण आढळून येत असताना सातपूर परिसरात मात्र एकही रुग्ण आढळून आलेला नाही, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

- Advertisement -

यामुळे झाले शक्य

  • लॉकडाउनपूर्वीच सातपूरकरांचा जनता कर्फ्यू
  • कर्फ्यूला नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद
  • लोकसहभागातून आयसोलेशन सेंटरची उभारणी
  • कंपन्यांमध्ये तसेच महापालिका रूग्णालयात तपासणी संख्या वाढवली
  • लक्षणे आढळणार्‍यांंना कोविड सेंटरला आणण्यात आल्याने संसर्ग कमी
  • नागरिकांचा कोरोना चाचणीसाठी पुढाकार
  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन
  • कंपन्या बंद असल्याने घराबाहेर पडणे टाळले
  • नगरसेवकांची औषध फवारणी मोहीम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -