घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखान्देश महोत्सवात गायक शंकर महादेवनसह कलाकारांची उपस्थिती

खान्देश महोत्सवात गायक शंकर महादेवनसह कलाकारांची उपस्थिती

Subscribe

२२ ते २५ डिसेंबर दरम्यान महोत्सवाचे आयोजन

नाशिक : नाशिक शहरात मागील वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या खान्देश महोत्सवात दिल्या जाणार्‍या खान्देश रत्न पुरस्कारांची घोषणा आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत केली. २२ ते २५ डिसेंबर रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गायक शंकर महादेवन, चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे, योगेश शिरसाठ यांची प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे.

खान्देशी संस्कृतीची माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने मागील वर्षापासून खान्देश महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यंदाही हा महोत्सव २२ ते २५ डिसेंबर दरम्यान ठक्कर डोम येथे आयोजीत करण्यात आला आहे. या महोत्सवात खान्देशातून नाशिकमध्ये स्थायिक होऊन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा ११ खान्देशरत्न निवडण्यात आले असल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली. २५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिीत या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले. यात प्रामुख्याने जागतिक कीर्तीचे गायक शंकर महादेवन यांचा कार्यक्रम खास आकर्षण रहाणार आहे. याशिवाय मराठी अभिनेते भारत गणेशपुरे, नृत्यांगना अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेत्री हेमांगी कवी, चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाठ,लावणी नृत्य कलाकार सुवर्णा काळे,यासारखे दिग्गज कलाकार नाशिककरांना मनोरंजनाची मेजवानी देणार आहेत.

- Advertisement -

खान्देशरत्न पुरस्काराचे मानकरी

विशेष पुरस्कारासाठी गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर.पाटील यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, १३१ वेळा रक्तदान करणारे पत्रकार दिलीप कोठावदे,पहाट पाडवाचे प्रणेते शाहु खैरे,आदर्श शिक्षिका कुंदा बच्छाव शिंदे, कामगार ते यशस्वी उद्योजक बुधाजी पानसरे, उद्योजक मनोज कोतकर, रणजी क्रिकेटपटू सत्यजीत बच्छाव, अपंग संघटनेचे बाळासाहेब घुगे, निरुपणकार संजय धोंडगे महाराज,बहुभाषिक गायिका रायमा रज्जाक शेख ( पिहू ) व युनायटेड वुई स्टँड एनजीओ सागर मटाले यांचा समावेश आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -