घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखर्च झाले दहा खोके तरीही अनंत कान्हेरे मैदान नॉट ओके

खर्च झाले दहा खोके तरीही अनंत कान्हेरे मैदान नॉट ओके

Subscribe

नाशिक : शहरातील व्यायामप्रेमींचे आवडते ठिकाण असलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या नुतणीकरणाचे काम सुरू होऊन तीन वर्षे उलटली आहेत. या कामासाठी आतापर्यंत दहा कोटी रूपये खर्च करण्यात येऊनही ट्रॅकवरील समस्या ‘जैसे थे’ च असल्याने जॉगर्स क्लबने या कामाबाबत शंका उपस्थित करत नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे या कामांची तपासणी करण्यात येऊन लवकरात लवकर हे मैदान व्यायामप्रेमींना खुले करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिककर व्यायामप्रेमींसाठी हक्काची जागा आहे. नुतनीकरणासाठी चारही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. याकरीता आतापर्यंत ट्रॅकच्या नुतनीकरणाच्या कामासाठी दहा कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र या कामाबाबत जॉगर्स क्लबने नाराजी दर्शवली आहे. काम पुर्ण करण्याची मुदत एक वर्षाची असतांना तीन वर्षे उलटूनही अजूनही २० टक्के काम अपूर्ण आहे. ट्रॅकवर म्युझिक सिस्टीम लावण्यात आली होती मात्र काम हाती घेतल्यापासून ही सिस्टिमच बंद आहे.

- Advertisement -

उन्हाळ्यामध्ये धुळीमुळे वयोवृद्ध व जॉगिंग करणार्‍यांना धुळीचा त्रास होतो येथे पाण्याचे फवारे लावले आहे पण बरेचसे निकामी झाल्याने ट्रॅकवर धुळीचे साम्राज्य दिसून येते. तसेच ट्रॅकवरील झाडेही सुकत चालली आहेत. दहा कोटी खर्च करूनही ज्या काही सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे या कामाबद्दल मोठी शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मैदानाच्या गेट बाहेर अतिक्रमण वाढत असून कामामुळे वाहनेही गेटवरच लावावी लागत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शासकीय विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला असलेले गेट खुले केल्यास वाहतूक कोंडी टाळता येऊ शकते. त्यामुळे ट्रॅक समस्यामुक्त करण्याची मागणी जॉगर्स क्लब व जॉगिंगला येणार्‍या नागरीकांच्यावतीने कृष्णा नागरे, योगेश देशपांडे , उदय कोठारी, दीपक काळे, जगदीश गडकरी, शेखर निकुंभ, जगदीश पोद्दार, विनय बिरारी, भरत गुरव, संजय ओढेकर, हेमंत गोसावी, अजय गुप्ता व सर्व महिला सभासदांची केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -