घरमहाराष्ट्रनाशिकलग्नाच्या काही तासांपूर्वीच तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लग्नाच्या काही तासांपूर्वीच तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

विवाहाला काही तास राहिले असतानाच पंचवटीतील मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, १८ एप्रिलला रात्री घडली.

विवाहाला काही तास राहिले असतानाच पंचवटीतील मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, १८ एप्रिलला रात्री घडली. गंगापूररोडवरील एका फ्लॅटमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आल्याने वधू-वर कुटुंबातील सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेमागील कारणाचा पोलिस तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील रेशीमबंध मंगल कार्यालयामागे राहणार्‍या निखिल प्रकाश देशमुख (वय ३०) याचा विवाह नाशिकमधीलच मोठ्या कुटुंबातील मुलीशी ठरला होता. शनिवारी, २० एप्रिलला विवाहाची तारीखही निश्चित झाली होती. दोन्हीही घरांत विवाहाची लगबग सुरू असताना गुरुवारी, १८ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता निखिल घराबाहेर निघाला. यावेळी त्याच्या आईने, शुक्रवारी घरी हळदीचा कार्यक्रम असल्याने बाहेर फिरू नको, असे सांगितले. मात्र, लगेचच परत येतो असे बोलून तो गेला. रात्री १० वाजेपर्यंत त्याचा मोबाईल सुरू होता. मात्र, नंतर फोन बंद झाल्याने त्याचे कुटुंब काळजीत पडले.

- Advertisement -

शोध सुरू असतानाच कुटुंबियांना निखिलच्या मृत्यूची बातमी समजली. फ्लॅट ५, डिव्हाईन सोसायटी, बळवंतनगर, गंगापूर रोड या ठिकाणी त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. घरातील लग्नकार्यामुळे उत्साहात तयारी करत असलेल्या कुटुंबीयांवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, निखिलच्या पार्थिवावर शुक्रवारी, १९ एप्रिलला सकाळी पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची गंगापूर पोलिसांनी नोंद केली असून, घटनेमागील कारण शोधले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -