घरमहाराष्ट्रनाशिकपर्यटन क्षेत्र म्हणून तपोवन विकसित करावे

पर्यटन क्षेत्र म्हणून तपोवन विकसित करावे

Subscribe

साधुग्रामसाठी आरक्षित जागा राखीव हवी

पंचवटी : कुंभमेळा हा असा धार्मिक सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. नाशिक शहरात भरणार्‍या कुंभमेळ्यात सर्व साधू-महंतांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणजे साधुग्राम याच तपोवन भागात असते. सत्ताधारी पक्षातील माजी स्थायी समिती सभापती तसेच विद्यमान प्रभाग सभापती यांचा कृष्ण नगरपासून ते नांदूर-मानूर गावापर्यंत हा नवीन प्रभाग क्रमांक ४ आहे. कुंभमेळ्यात शहरातील विकाससाठी कोट्यवधी रुपये येत असतानाही प्रभागात अपेक्षित विकास किंवा नियोजन मात्र झालेले नाही.

या आहेत समस्या

  • लॉन्स आणि मंगल कार्यालये मोठ्या संख्येने असल्याने वाहतूक कोंडीची समस्या.
  • कॉलनी रस्त्याची दूरवस्था झालेली असून अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद.
  • प्रभागात मनोरंजनासाठी किंवा लहान मुलांच्या खेळण्यासाठी कुठेही उद्यान नाही.
  • परिसरातील उद्यानांमध्ये खेळण्यांची दूरवस्था झालेली आहे.
  • मिर्ची हॉटेल चौफुली येथे अपघात वाढले आहेत.

काय हवे प्रभागात

  • प्रभागातील युवक-युवतींना स्पर्धे परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिका व डिजिटल लायब्ररी.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ असावा. प्रभागातील महिलांसाठी गृहउद्योग आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे.
  • मिर्ची हॉटेल चौफुली येथे हम्प किंवा गतिरोधक बसवावेत.
  • प्रभागात स्लम परिसर अधिक असल्याने महापालिकेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात यावी.
  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर प्रभागाचा व्यापक विकास व्हावा.

हे आहेत इच्छूक

उद्धव निमसे, सुरेश खेताडे, मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, विशाल जेजुरकर, विद्या जेजूरकर, सोमनाथ बोडके, राहुल दराडे, वैभव ठाकरे, अमोल सूर्यवंशी, अश्विनी लभडे, शैलेश सूर्यवंशी, सुनीता निमसे, किरण पानकर, समाधान जेजूरकर, कमलाकर गोडसे, संकेत निमसे, भाऊसाहेब निमसे, अनंता सूर्यवंशी, संतोष जगताप, अमोल जगळे, उज्ज्वला बेलसरे, रामभाऊ संधान, सुवर्णा संधान, नीलेश पारीख.

- Advertisement -

प्रभागाचा परिसर 

कृष्ण नगर, केवडीबन, पंचवटी अमरधाम परिसर, तपोवन, स्वामीनारायण परिसर, बळी मंदिर समोरील परिसर, अपोलो हॉस्पिटल, अमृतधाम, बिडी कामगार नगर, हनुमान नगर, निलगिरी बाग,
नांदूर-मानूर गावठाण.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -