घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकची हवा बिघडली

नाशिकची हवा बिघडली

Subscribe

नाशिक : शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात हवेची गुणवत्ता निर्देशांक थेट २५२ पर्यंत जाऊन पोहचला आहे. नाशिक म्हणजे स्वच्छ हवा, पाणी आणि वातावरणाचे शहर म्हणून प्रचलित आहे. परंतु, मागील काही वर्षात झपाट्याने वाढलेले शहरीकरण आणि ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ याचा पडलेला विसर यामुळे नाशिकच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच हवा गुणवत्ता निर्देशांक खालवला आहे.

दिवाळीच्या आधी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४८वर अर्थात अत्यंत उत्तम अश्या स्वरुपात होता. त्यानंतर तो १४३ म्हणजेच मध्यम स्वरुपात होता. मात्र, आता थेट २५२वर जाऊन पोहचल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमात नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे हवामानाबाबत केंद्राचे नाशिकवर विशेष लक्ष असते. सोमवारी (दी.२८) मिळालेल्या हवा गुणवत्ता निर्देशांकात नाशिकच्या हवे गुणवत्तेचा स्तर २५२वर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकच्या हवेची गुणवत्ता खराब होण्यामागे वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि रस्त्यावरील धूळ सगळ्यात मोठे कारण पाहणीत समोर आले आहे.

- Advertisement -

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. तसेच खड्ड्यांमुळे वाहनेही संथ गतीने प्रवास करतात त्यामुळे ते सरासरीपेक्षा अधिक काळ रस्त्यावर असतात. या दोन्ही कारणांमुळे प्रदूषणात मोठी वाढ होते. पावसाळा संपल्याने आता माती कोरडी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुळीच साम्राज्य झाल आहे. तर, वाहनेही अधिक वेळ रस्त्यावर असल्याने त्यातूनही प्रदूषण वाढीस लागत आहे. यामुळे प्रामुख्याने शहराची हवा खराब झाल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -