घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेचा वर्धापन दिन रंगणार आयुक्तांच्या स्वरांनी

महापालिकेचा वर्धापन दिन रंगणार आयुक्तांच्या स्वरांनी

Subscribe

नाशिक : महापालिकेचा ४० वा वर्धापन दिन सोमवारी (दि. ७) साजरा होणार आहे. यानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महानगर पालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रशासन विभागात सकाळी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ६.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कालिदास कलमंदिरात आयोजित करण्यात येणार्‍या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमात आयुक्तांसह अधिकारी, कर्मचारी सहभागी होत गाणी सादर करणार आहेत.

वर्धापन दिन निमित्ताने मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहा विभागीय कार्यालयाच्या इमारती आणि कालिदास नाट्यगृहावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वर्धापन दिन निमित क्रिकेटचा सामनाही रंगणार आहे. रविवारी (दि.६) सकाळी १० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महापालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांचा क्रिकेट सामना खेळण्याचे नियोजन केले आहे. यावेळी आयुक्त देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटणार आहेत. नाशिक महानगरपालिका स्थापन होऊन ४० वर्ष पूर्ण करत असताना महानगरपालिकेने अनेक स्थित्यंतर बघितली. त्याचसोबत शहराचे एकूण स्वरूप बदलत असताना. शहराची व्याप्ती वाढत असताना एच्छिक विकास साध्य करत शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, मूलभूत सुविधा पुरवणे, पाणी पुरवठा, कचरा, मलनित्सारण आदि व्यवस्था निर्माण करणे त्यांचे योगी नियोजन करणे याबाबत महानगरपालिका स्वयंभू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -