घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक बाजार समितीचे वातावरण तापले; 'त्या' प्रकरणी, स्टंटबाजी म्हणत चुंबळेंचा विरोधकांवर पलटवार

नाशिक बाजार समितीचे वातावरण तापले; ‘त्या’ प्रकरणी, स्टंटबाजी म्हणत चुंबळेंचा विरोधकांवर पलटवार

Subscribe

नाशिक : मध्यंतरीच्या काळात माझ्यावर दोन वेळा शस्त्रक्रीया करण्यात आल्यामुळे मला तारखांना हजर राहता आले नाही, न्यायालयाच्या आदेशान्वये २६ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी विरोधकांकडून स्टंट केला जात आहे] जर मी खरोखर पैसे घेतले असते तर मी देखील माजी सभापती पिंगळे यांच्यासारखा कारागृहात गेलो असतो. याच प्रकरणातील मुख्य अर्जदार रवी भोये हे देखील निवडणुकीत माझ्या सोबत आल्याने विरोधकांना ते बघवत नसल्याने माझ्या विरोधात अपप्रचार करत असल्याचा आरोप माजी सभापती शिवाजी चुंभळे यानी केला आहे.

विरोधी गटाचे प्रमुख नेते शिवाजी चुंभळे यांना जारी झालेल्या अटक वॉरंटमुळे उलटसुलट चर्चा सुरु आहे. अद्याप मुख्य प्रचाराला सुरुवात देखील झाली नसली तरी निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. बाजार समितीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. मुख्य लढत पिंगळे विरुध्द चुंभळे अशीच होणार आहे. त्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना ऑगस्ट २०१९ मध्ये ई-नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचार्‍यांकडून लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. याच प्रकरणात शनिवारी (दि.१५) जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. त्यात त्यांना २६ जून २०२३ रोजी न्यायालयात हजर होण्याबाबत सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा विरोधकांकडून बाऊ करण्यात आल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -