घरमहाराष्ट्रनाशिकमहागाईने हिरावला हार-कंगनचा गोडवा; २० टक्क्यांनी किंमती वाढल्या

महागाईने हिरावला हार-कंगनचा गोडवा; २० टक्क्यांनी किंमती वाढल्या

Subscribe

पावसामुळे व्यवसायिकांची धावपळ

 नाशिक : गुढीपाडव्यासाठी साखरेच्या हारांना मोठी मागणी असते. मात्र कच्चा माल महागल्याने साखरेचे हार कंगन महागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांनी ही भाव वाढ झाली आहे. साखर हारांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी मात्र नागरिक खरेदीसाठी उत्साह दाखवत आहेत.

साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांना अधिक महत्त्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. साखर हारांबरोबरच पंचांग, रेशीम वस्त्र, कडूलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा, तांबा-पितळ, रांगोळी, पताका आणि गुढीसाठी बांबूची काठी आदी वस्तूंची दुकाने देखील शहरातील मेन रोड, रविवार कारंजा, शालीमार, पंचवटी भागात थटली आहेत.

- Advertisement -

शहराच्या बाजार पेठेत साखर हार १०० ते ११० रुपये किलो आणि ४० ते ५० रुपये प्रती हार दराने विक्री केली जात आहे. तर ठोकमध्ये ७० रुपये किलो या दराने विकले जात आहे. मागचे दोन वर्ष कोरोनामुळे झालेल्या नुकसानामुळे गरीब व्यवसायिकांचे हाल झाले होते. अशातच साखर आणि कामगारांच्या मजुरीत वाढ झाल्याने यंदा साखर हाराच्या दरात वाढ झाली, असे व्यावसायिकांनी सागितले.

पावसामुळे व्यवसायिकांची धावपळ

गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. त्यातच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने व्यापार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक व्यापर्‍यांचा माल देखील भिजला. खरेदीला आलेले ग्राहकही दुकानांच्या कडेला आसरा शोधतांना दिसून आले.

साखर हारांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली असली तरीही ग्राहक मात्र उत्साहात खरेदी करत आहेत. गेली दोन वर्ष आम्हाला व्यवसायात तोटा सहन करावा लागला होता, परंतु यंदा ती कसर भरून निघेल अशी आशा आहे. – भास्कर भोई (विक्रेते)

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -