घरमहाराष्ट्रनाशिकरात्रीच्या वेळी बिबट्याचा धोका; शेतीसाठी वीजपुरवठा दिवसा करण्याच्या मागणीला जोर

रात्रीच्या वेळी बिबट्याचा धोका; शेतीसाठी वीजपुरवठा दिवसा करण्याच्या मागणीला जोर

Subscribe

नाशिक : दारणा व गोदाकाठच्या गावात बिबट्यांचा संचार वाढल्याने रात्री शेतीसाठी पाणी देणे अत्यंत जोखमीचे झाले आहे. शेतकर्‍यांमध्ये दहशत आहे. भारनियमनाच्या वेळेत बदल करुन पूर्णवेळ दिवसा वीजपुरवठा करावा अन्यथा आपण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार सरोज अहिरे यांनी दिला.

आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघात संवाद अभियान सुरू केले असून, रविवारी (दि.५) शिलापूर येथे झालेल्या मेळाव्यात मतदारसंघातील सिद्ध पिंपरी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, विंचूर गवळी, एकलहरे, गंगावाडी, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी या गावातील भारनियमन, रस्ते, पाणी इ. विषयांवर चर्चा झाली. यावेळी आ. अहिरेंनी महाविकास आघाडीच्या काळात सुमारे चारशे कोटींची कामे मंजूर करुन आणल्याने प्रत्येक गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. सरकार बदलल्याने विकासकामांचा वेग मंदावणार असल्याची जाणीव मतदारांना करुन दिली. अनेक विकासकामे मार्गी लागल्याने ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांनी समाधान व्यक्त केले. एकलहरे गावात महानिर्मितीच्या सीएसआर फंडाचा प्रश्न मार्गी लागला असून, निधी मंजुरीसाठी आमदारांनी प्रयत्न करण्याची मागणी सागर जाधव यांनी केली.

- Advertisement -

यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रतन जाधव, शेतकरी संघटनेचे शंकर ढिकले, माजी जि.प. सदस्य यशवंत ढिकले, मनोहर कोरडे, सोमनाथ बोराडे, माजी सभापती निवृत्ती कांडेकर, माजी सभापती कैलास चव्हाण, माजी सरपंच बाळासाहेब म्हस्के, विक्रम कोठुळे, शिलापूर ग्रामपंचायत सदस्य लिला कहांडळ, सिद्ध पिंपरीचे सरपंच मधुकर ढिकले, दत्ता ढिकले, एकलहरे सरपंच अरुण दुशिंग, उपसरपंच दिलीप राजोळे, सचिन जगताप, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुगे, लाखलगाव गंगापाडळी सरपंच सुरेखा वलवे, प्रशांत आवारे, ओढा सरपंच प्रिया पेखळे, विंचूर गवळी सरपंच विजया रिकामे, उज्वला जगळे, विष्णु बोराडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -