पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मंगळवारी अंतिम मुदत

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी आज अंतिम मुदत

Eleventh online admission

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची मंगळवारी (दि. १८) पर्यंत अंतिम मुदत आहे.

पॉलिटेक्निकच्या ८४ महाविद्यालयांत तब्बल २८ हजार जागा उपलब्ध आहेत. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी व पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत पूर्ण होईल. प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून मागील वर्षापर्यंत अनिवार्य असलेली गणित (७१ कोड) व विज्ञान (७२ कोड) ही अट यंदाच्या वर्षापासून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरणार आहे. दहावीच्या परीक्षेत तसेच समकक्ष शिक्षणक्रमात ३५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरेल. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४००, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क आहे.