घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकेश्वर प्रकरण : संजय राऊतांनी धूप दाखवण्याच्या परंपरेचा पुरावा द्यावा; तुषार भोसलेंचे आव्हान

त्र्यंबकेश्वर प्रकरण : संजय राऊतांनी धूप दाखवण्याच्या परंपरेचा पुरावा द्यावा; तुषार भोसलेंचे आव्हान

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वर प्रकरणी (Trimbakeshwar case) ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका मांडली होती की, मंदिरामध्ये संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा आहे. या वक्तव्यावर उत्तर देताना भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी संजय राऊत यांना आव्हान केले की, धूप मंदिरात दाखवण्याची 100 वर्षांची कोणती परंपरा आहे याचा त्यांनी पुरावा द्यावा.

तुषार भोसले म्हणाले की, त्र्यंबकेश्वर प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी एसआयटी नेमली आणि चार जणांवर गुन्हा दाखल केला. या सर्व प्रकारामध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भूमिका मांडली की, मंदिरामध्ये संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा आहे. मग महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी तीच ओळ पुढे रेटून नेली. अनेक लोक त्याच ओळीत बोलायचे लागले आणि याच्याकरता अनेक माध्यमांतून स्थानिक शांतता समितीची एक पत्रकार परिषद दाखवली गेली. याच्यात ते दावा करतात की, अशी परंपरा जुनी आहे. पण माझं आजसुद्धा चॅलेंज आहे ती पत्रकार परिषद नीट ऐकली तर त्याच स्थानिकांनी ज्यांनी ती शांतता समितीची पत्रकार परिषद घेतली त्यांच्याच परिषदेमधले वाक्य आहे की, ही परंपरा जुनी आहे, पण धूप चौकात दाखवण्याची परंपरा आहे, अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली.

- Advertisement -

चौकात धूप दाखवण्याची परंपरा आम्ही परंपरा बघत आलो आहोत. पण यावर्षी हे लोक मंदिराच्या गेटवर का गेले हे आम्हाला कळले नाही आणि गेले असतील तर मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांनी का अडवले नाही असा प्रतिप्रश्न त्यांनीच केलेला आहे. म्हणून संजय राऊतांचे दात घशात घालण्याचे काम शांतता समितीने केले आहे. त्यामुळे संजय राऊतांना माझं आव्हान आहे, त्यांनी पुरावा द्यावा ही धूप मंदिरात दाखवण्याची 100 वर्षांची कोणती परंपरा आहे. धूप चौकात दाखवण्याची परंपरा उरुसला, संदलला असू शकते, पण आमच्या मंदिरात येण्याची, मंदिराच्या पायऱ्यावर आणि प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही, म्हणून संजय राऊतांचा दावा सपशेल खोटा आहे, असे आरोप तुषार भोसले  यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -