घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकेश्वर पेड दर्शनाचा वाद न्यायालयात

त्र्यंबकेश्वर पेड दर्शनाचा वाद न्यायालयात

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पेड दर्शन बंद करण्यात यावे याकरीता मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, रांगेत दिर्घकाळ उभे राहावे लागू नये, सासाठी देवस्थानने २०० रूपये प्रतीव्यक्ती असे देणगी दर्शन गेल्या काही वर्षांपासून सुरू केले आहे. मात्र हा पकार बंद करून सर्व भाविकांना समान वागणूक देत रांगेतच कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता दर्शन घेण्याची सक्ती करावी अशी विनंती पुरातत्व खात्याने यापूर्वी देवस्थानला पत्राव्दारे केली आहे.

मुळात त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुरातत्व विभागांतर्गत येते. जी वास्तु पुरातत्व विभागांतर्गत येते त्या वास्तूत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणे हे पुरातत्व स्थळ १९५८ च्या विरूध्द आहे. त्यामुळे अशा प्रकारचे शुल्क आकार तात्काळ थांबवावे असे पुरातत्व विभागाने सुचित केले आहे मात्र तरीही देवस्थानकडून व्हीआयपी शुल्क आकारणी सुरू आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पेड दर्शन बंद करावे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी केली आहे. याकरीता गेल्या आठ वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. मंदिरातील पेड दर्शन बेकायदेशीर असल्याचे सांगत शिंदे यांनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. यापूर्वी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांची भेट घेत शिंदे यांनी त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र तरीही पेड दर्शन सुरू असल्याने आता शिंदे यांनी याविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे देवस्थान काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातल 200 रू तिकीट दर्शन (पेड दर्शन ) यावर मी गेली 7-8 वर्षे झाली लढत आहे. याविरोधात अनेक पत्रव्यवहार केले पण बेकायदेशीर पेड दर्शन काही बंद होत नाही. यात सामान्य भाविकांची फसवणूक होत आहे आता याबबत मी ऊच्च न्यायालयात जात जाण्याचा निर्णय घेतला आहे. : ललिता शिंदे, माजी विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -