घरमहाराष्ट्रनाशिकटोइंगवाल्यांची मुजोरी; चालकासह उचलली बाईक

टोइंगवाल्यांची मुजोरी; चालकासह उचलली बाईक

Subscribe

(सीबीएससमोरील घटना, उपस्थित वाहतूक पोलिसाचीही डोळेझाक)

मध्यवर्ती भागातील रस्त्यांची कामे, पार्किंगच्या समस्या आणि टोईंवरील कर्मचार्‍यांच्या मुजोरीमुळे नाशिककर त्रस्त आधीच त्रस्त झालेले असताना, सोमवारी (८ जुलै) या कर्मचार्‍यांनी चालकासह थेट गाडीच उचलत आणखी एक प्रताप केला. नवीन सीबीएससमोर घडलेल्या या घटनेत वाहतूक पोलिसानेही डोळेझाक केली.

ठक्कर बाजारच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सायंकाळी टोइंगवाल्यांची मुजोरी बघायला मिळाली. या कर्मचार्‍यांनी युवकासह गाडी उचलून ती टोईंग व्हॅनमध्ये ठेवली. युवकाने विनवणी करुनही या कर्मचार्‍यांनी त्याला खाली उतरवून दिले. बस स्थानकात आलेल्या पाहुण्यांना घेऊन येण्यासाठी या युवकाने गाडी उभी केली होती. आवाज देण्यासाठी दोन पाऊलं पुढे जाताच, मागे टोइंग व्हॅन आल्याचे कळताच तो मागे फिरला आणि चटकन गाडीवर जाऊन बसला. यावेळी गाडीजवळ आलेल्या टोइंग कर्मचार्‍यांनी गाडी नो पार्किंगमध्ये असल्याचे सांगत गाडी उचलण्याचा प्रयत्न केला. युवकाने जागेवरच दंड देण्याची तयारी दर्शवली. मात्र, काहीही न ऐकता टोइंग कर्मचार्‍यांनी त्याच्यासह गाडी टोईंग व्हॅनमध्ये ठेवली.
ट्रॅफिक सेलकडे दुर्लक्ष, नागरिकांची फरफट
शहरातील रस्ते, वाहतूक नियम, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस यांच्या सहभागातून मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही ट्रॅफिक सेल (वाहतूक कक्ष) सुरू करण्याची गरज आहे. हा प्रस्ताव २०१३ सालापासून सोयीस्कररित्या दुर्लक्षित केला जातो आहे. या विभागामुळे शहरातील पार्किंगसह वाहतुकीशी संबंधित अनेक समस्या मार्गी लागू शकतात. मात्र, लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांनाही याबाबत जराही आस्था नसल्याचे चित्र आहे. सिग्नल्सची स्थाननिश्चिती, दुभाजकांचे पंक्चर्स, जंक्चर्स कुठे असावेत, पायाभूत सुविधांची उभारणी अशी अनेक कामे या दोन्हीही यंत्रणांच्या समन्वयातून मार्गी लागू शकतात.

- Advertisement -

कर भरुनही मनस्ताप

महापालिकेला विविध कर भरुनही नाशिककरांना सुविधांच्या बाबतीत मात्र मनस्ताप सहन करावा लागतो आहे. एका बाजूला रस्ते कर भरायचा आणि दुसरीकडे रस्त्यावरील स्मार्ट पार्किंगसाठी पैसे द्यायचे, अशा प्रकारामुळे नाशिककर बेजार झाले आहेत. दिवसेंदिवस शहरातील कोंडी वाढत असताना, त्या गतीने पायाभूत सुविधांची पूर्तता होत नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे.

जागेवर दंड भरल्यास सवलत

टोइंग करताना गाडी उचलण्यावेळीच वाहनचालक उपस्थित झाल्यास अशा वेळी दुचाकीसाठी केवळ १०० रुपये भरून गाडी सोडविता येते. मात्र, हीच गाडी उचलून नेल्यास ती सोडविण्यासाठी अडीचशे रुपयांचा दंड वाहनचालकाला भरावा लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -