घरमहाराष्ट्रनाशिकपत्रकारांचे लसीकरण प्राधान्याने करा

पत्रकारांचे लसीकरण प्राधान्याने करा

Subscribe

येवलयातील अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाची मागणी

प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील सर्व पत्रकारांचे तात्काळ लसीकरण करावे व उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघ, येवला यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. कोरोना काळात घरच्यांचा जीव टांगणीला लावून फिल्डवर काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात काही पत्रकारांना आपला जीव देखील गमवावा लागला. या सर्व बाबींचा विचार करता फ्रंटलाईन वर्कर म्हणून शासनाने सर्व पत्रकारांना प्राध्यान्याने लसीकरण करणे गरजेचे आहे. बातमीदारी करताना या पत्रकारांना कोरोनाचो संसर्ग झालेला आहे, ज्यांनी उपचार घेतलेले आहे ते सर्व पत्रकारांना शासनाकडून खर्च मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी पत्रकारसंघाचे तालुका अध्यक्ष प्रसाद गुब्बी, उपाध्यक्ष धीरज परदेशी, महासचिव विलास कांबळे, प्रसिद्धी प्रमुख आरिफ शेख, संघटक शाकिर शेख उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -