घरमहाराष्ट्रनाशिकव्ही. एन. नाईक संस्थेसाठी आज मतदान

व्ही. एन. नाईक संस्थेसाठी आज मतदान

Subscribe

संस्थेच्या कॅनडा कॉर्नर येथील अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या इमारतीत ३९ बूथची व्यवस्था

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.२०) मतदान होणार आहे. संस्थेच्या कॅनडा कॉर्नर येथील अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या इमारतीत ३९ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे सात हजार सभासद आज दिवसभरात मतदानाचा हक्क बजावतील.

नाईक शिक्षण संस्थेसाठी ३९ बूथची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक बुथवर ११ कर्मचारी उपस्थित असणार आहेत. ११ पैकी दोन कर्मचारी हे प्रति पॅनलकडून एक या प्रमाणे उपस्थित असतील. ४२९ कर्मचारी मतदानाच्या कार्यात सहभागी असतील. यासोबतच सभासदांची संख्या आणि निवडणुकीचा माहोल विचारात घेऊन कडक पोलीस बंदोबस्तही पुरवण्यात येणार आहे. १०० पोलीस कर्मचारी यावेळी सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणार आहेत. जिल्हाभरातून येणार्‍या हजारो सभासदांची उपस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रानजीक १० वाहतूक पोलिस कर्मचारीही तैनात असतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र सानप यांनी दिली. या मतदानानंतर रविवारी (दि.२१) संस्थेच्या आवारातच मतमोजणी होणार असून सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होईल. रविवारी सायंकाळपर्यंत निकाल घोषित होणे अपेक्षित आहे. २९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

प्रगती पॅनल उमेदवार

अध्यक्ष- कोंडाजी आव्हाड, उपाध्यक्ष- प्रभाकर धात्रक, सरचिटणीस- हेमंत धात्रक, सहचिटणीस- तानाजी जायभावे, विश्वस्त- बाळासाहेब गामणे, डॉ. धर्माजी बोडके, बबनराव सानप, बाळासाहेब चकोर, रामप्रसाद कातकाडे, विठ्ठलराव पालवे, नाशिक प्रतिनिधी- माणिकराव सोनवणे, महेंद्र आव्हाड, प्रकाश घुगे, गोकुळ काकड, दिंडोरी प्रतिनिधी- कचरू आव्हाड, शरद बोडके, भालचंद्र दरगोडे, सिन्नर प्रतिनिधी- हेमंत नाईक. पी.पी. आव्हाड, गणेश घुले, निफाड प्रतिनिधी- रामनाथ नागरे, भगवान सानप, गणपत केदार, येवला- संपत वाघ व दिनेश आव्हाड, नांदगाव प्रतिनिधी- विजय इप्पर व रमेश बोडके, महिला प्रतिनिधी- अरुणा कराड व आक्काबाई सोनवणे.

क्रांतीवीर पॅनल उमेदवार

अध्यक्ष- पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष- अ‍ॅड. पी. आर. गिते, सरचिटणीस- अभिजीत दिघोळे, सहचिटणीस- मनोज बुरकुल, विश्वस्त- भास्कर सोनवणे, दामोदर मानकर, दिगंबर गिते, बाळासाहेब वाघ, सुभाष कराड, अ‍ॅड. अशोक आव्हाड, नाशिक प्रतिनिधी- मंगेश नागरे, विलास आव्हाड, सुरेश घुगे, विष्णू नागरे, निफाड प्रतिनिधी- अशोक नागरे, अ‍ॅड. सुधाकर कराड, विठोबा फडे, दिंडोरी प्रतिनिधी- दौलत बोडके, शामराव बोडके, भगवंत चकोर, येवला प्रतिनिधी- तुळशीराम विंचू, विजय सानप, नांदगाव प्रतिनिधी- अ‍ॅड. जंयत सानप, विजय बुरकुल, सिन्नर प्रतिनिधी- रामनाथ बोडके, उत्तम बोडके, अशोक भाबड, महिला प्रतिनिधी- अंजनाबाई काकड, शोभा बोडके.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -