घरमहाराष्ट्रनाशिकपुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी उद्या मतदान

पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी उद्या मतदान

Subscribe

अध्यापक गटात १३ जागा : तीन जिल्ह्यांत ७५०० मतदार

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) अध्यापक गटाच्या १३ जागांसाठी उदया  सकाळी १० ते सायंकाळी ५  या वेळेत मतदान होत आहे. नाशिकसह अहमदनगर व पुणे जिल्ह्यात एकूण ७५०० प्राध्यापक मतदार हे या निवडणुकीसाठी मतदानास पात्र आहेत.

पुणे विद्यापीठात महिन्यापूर्वी झालेल्या सीनेट (पदवीधर) निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने १० पैकी ९ जागा जिंकत सत्ता मिळवली. संस्थाचालकांच्या गटातही बहुतांश जागा बिनविरोध झाल्यानंतर आता अध्यापक गटातील प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये महाविद्यालय आणि परिसंस्थेतील दहा अध्यापक आणि विद्यापीठातून तीन अध्यापकांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्याशाखेचे दोन अध्यापक यांची विद्या परिषदेवर आणि महाविद्यालयातील तीन विभागप्रमुख प्रत्येक अभ्यास मंडळावर निवडून देण्यात येणार आहेत. नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून १० जागा निवडण्यात येणार असून त्यासाठी विद्यापीठ विकास मंच व प्राध्यापकांची संघटनांनी मिळून सर्वसमावेशक पॅनल निर्माण केले आहे. दहा जागांमध्ये पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी तर ओबीसी, एससी, एसटी, एनटी व महिला गटासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. जिल्ह्यात १७०० मतदार आहेत.

- Advertisement -

राजेश पांडे यांचा सत्कार

जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र समन्वयकपदी विद्यापीठ विकास मंचचे प्रमुख राजेश पांडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी विद्या मंदीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे, मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -