घरमहाराष्ट्रनाशिकनळाला २० दिवसांनी पाणी; हातपंपावर सहा दिवसांचे ‘बुकिंग’

नळाला २० दिवसांनी पाणी; हातपंपावर सहा दिवसांचे ‘बुकिंग’

Subscribe

अस्वस्थ शिवार’ : चांदवड तालुक्यातील मेसनखेड्याची शोकांतिका; कठडा तुटलेल्या विहिरीजवळ जीवघेणी कसरत

एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, असे वृत्त वाचायला मिळाले तरी शहरवासियांच्या पोटात गोळा येतो, पण चांदवड तालुक्यातील मेसनखेडा गावात नळाला पाणी तब्बल २० दिवसांच्या अंतराने येते. जे येते ते अतिशय कमी दाबाने आणि गढूळ. त्यामुळे गावकर्‍यांना हातपंप आणि विहिरीवर अवलंबून राहावे लागते. हातपंपावर पुढील सहा दिवसांसाठी नंबर लावलेले असतात. एका दिवसात एकाच कुटुंबाला चार – पाच हांडे पाणी मिळते. उर्वरित कुटुंब तळ गाठलेल्या आणि कठडे नसलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी जातात. उष्णतेचा पारा ४२ अंशावर गेलेला असताना महिलावर्गाची पाण्यासाठी ही कसरत दररोज सुरू असते.

चांदवडपासून अवघ्या १२ किलोमीटरवर मेसनखेडा खुर्द गाव. लोकसंख्या सुमारे ४ हजारांपर्यंत. गावकर्‍यांना सध्या चिंता आहे ती पाण्याची. गावाला सध्या नागासाक्या धरणातून ४२ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा होतो; परंतु नागासाक्या धरण कोरडेठाक झाल्याने गावाचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. महिलावर्ग गावाबाहेर असलेल्या विहिरीतून पाणी भरताना दिसतात. संपूर्ण गाव पाणी भरण्यासाठी या विहिरीभोवती जमत असल्याने यो विहिरीनेही तळ गाठला आहे. विहिरीतील नैसर्गिक स्त्रोतातून येणारे पाणी आणि महिलांकडून होणारा उपसा यातील फरक मोठा आहे. त्यामुळे विहीर आता कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. गावात हातपंप लावण्यात आला आहे. भूजल पातळी कमालीची घटल्याने दिवसभरातून चार ते पाच हांडे भरतील इतकेच पाणी निघते.

- Advertisement -

ग्रामस्थ म्हणतात…

सकाळपासून सायंकाळपर्यंत हातपंपावर पाण्याची वाट बघावी लागते. दिवसभरात चार-पाच हांडे पाणी मिळते. त्यात तीन हांडे पाणी गढूळ असते. दोनच हांडे पाणी पिण्यायोग्य असते. – संगीता ठोंबरे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य

पाणी भरण्यासाठी उन्हातान्हात फिरावे लागते. बोअरचे पाणी पिल्याने पोटाचे विकार जडत आहेत. विहिरीतीलही पाणी शुद्ध असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे गावात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. – सुनीता अनुशे

- Advertisement -

ओझरखेड धरणातून दुगावपर्यंतच पाणी पोहोचवण्याची व्यवस्था आहे. मात्र, दुगावच्याजवळील मेसनखेड्याला ओझरखेडमधून पाणी मिळत नाही. नागासाक्या धरण कोरडे झाल्याने ओझरखेडहून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी. – ज्ञानेश्वर पगार, गावकरी

Chandwad_Water
विहिरीतून पाणी काढताना महिलांना जीव धोक्यात घालावा लागतो.
नळाला २० दिवसांनी पाणी; हातपंपावर सहा दिवसांचे ‘बुकिंग’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -