घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील 'या' भागात शनिवारी पाणीपुरवठा खंडित

शहरातील ‘या’ भागात शनिवारी पाणीपुरवठा खंडित

Subscribe

नाशिक : मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशनसाठी महावितरण कंपनीच्या रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनच्या दुरूस्तीसाठी शनिवारी (दि.१७) नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागात होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याने शनिवार (दि.17) रोजी नवीन नाशिकमधील प्रभाग क्र. 24, 25, 26, 22 भागश: व 27, 28, 29, 31 या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पूर्व मधील प्रभाग क्र. 14, 15, 23, 30 भागश: या प्रभागांमध्ये सकाळ व सायंकाळचा संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही. तसेच, रविवार (दि.18) रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असेही महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -