घरमहाराष्ट्रनाशिकभीषणता वाढू लागली; १२२ गावांना ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

भीषणता वाढू लागली; १२२ गावांना ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Subscribe

टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना

नाशिक : ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना कडक उन्हात मैलोन् मैल पायपीठ करावी लागत असल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र ही व्यवस्था अपुरी पडत असल्याचे दिसून येते. सध्या जिल्ह्यातील १२२ गावांना ५९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढतच असून लवकरच टँकर संख्या शतक पार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता कमी जाणवेल, अशी अशा होती. मात्र, एप्रिल अखेरपासून टँकरच्या मागणीत वाढ होत चित्र दिसून येत आहे. त्यातच यंदा उन्हाच्या झळा तीव्र जाणवू लागल्याने पाण्याची मागणीही वाढत असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ६८ गावे, ५४ वाड्यांना ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याकरीता टँकरच्या १५१ फेर्‍या मंजूर करण्यात आल्या आहेत. तर ३३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकरची वाढती मागणी लक्षात घेता टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -