घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट सिटीचा ‘तिसरा डोळा’ कधी उघडणार; सीसीटीव्हीची आश्वासनपूर्ती कधी ?

स्मार्ट सिटीचा ‘तिसरा डोळा’ कधी उघडणार; सीसीटीव्हीची आश्वासनपूर्ती कधी ?

Subscribe

श्रीधर गायधनी । नाशिकरोड

गेल्या आठवड्यात नाशिकरोड येथून शिरिष सोनवणे या व्यावसायिकाचे अपहरण व खूनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. आठ दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाताला ठोस पुरावा न लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे असते तर तपासाला दिशा मिळाली असती, स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात साडेचार हजार कॅमेरे बसवण्याच्या योजनेला होणार्‍या विलंबाने नाशिककरांची सुरक्षा धोक्यात आल्याची भावना आहे. शहरात बोकाळलेली गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील चौक, गल्ली बोळात, चौकात, रस्त्यावर सीसीटीव्ही बसवण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

सोनवणेंचे अपहरण झाल्यापासून शहर व ग्रामीण पोलिसांची अनेक पथके व्यावसायिक शिरीष सोनवणे यांचा खून करणा-या गुन्हेगारांचा व कारचा शोध घेण्यासाठी शहरासह महामार्गावरील खाजगी सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज खंगाळत आहे, मात्र, काही ठिकाणी कॅमेरे बंद आहेत तर कॅमेरे रस्त्यावर नसून व्यावसायिकांनी आपल्या दुकानाकडे फिरवलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना हवे ते फुटेज मिळण्यात अडचणी येत आहे. शहरातील अनेक नगरसेवक व सामाजिक संस्थांकडून अनेक ठिकाणी कॅमेरे बसविले आहे. तोच काय शहरवासियांच्या सुरक्षेत हातभार, नाशिकरोडला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर मोजके सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मध्यवर्ती ठिकाणी बनविलेल्या रस्त्यावरील काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी संपूर्ण शहरात कॅमेर्‍यांची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक शहरातील एका भागातून गुन्हा करुन दुसर्‍या भागात पळ काढणारे गुन्हेगार व त्यांची वाहने शोधण्यात पोलिसांना अडथळे निर्माण होतात,शहरात दुचाकी चोरी, अपहरण, चोरी, हाणामा-या, खून, दरोडे, लूट आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होत आहे, स्मार्ट सिटीच्या नियोजनाप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर शहरात गुन्ह्याची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

- Advertisement -

सिन्नर फाटा येथून अपहरण करुन थेट मालेगावपर्यंत जाणारी कार व गुन्हेगार यांचा शोध गेल्या सहा दिवसांपासून लागत नाही, याचे मुख्य कारण मुंबई पुणेच्या धर्तीवर मनपाच्या सीसीटीव्ही कॅमेरे अपेक्षित आहे, ज्या भागातील कारखान्यातून सोनवणे यांचे अपहरण करण्यात आले त्या ठिकाणचे व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात विलक्षण अडचणी तयार झालेल्या आहेत, शहर पोलिसांच्या विविध पथकांकडून तांत्रिक मुद्यावर तपास सुरु असला तरी सीसीटीव्ही असते तर नक्कीच अद्यापपर्यंत गुन्हेगारांच्या हातात बेड्या असत्या यात शंका नाही.

पाच वर्षांपूर्वी सीसीटीव्हीचे नियोजन

नाशिक शहरातील नागरिकांची सुरक्षा व वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांपुर्वी मोठे पाऊल उचलण्यात आले होते, शहरातील घटनांमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे समोर येत आहे, चोरी, लूट, हाणामारी, अपघात, खून, बलात्कार, अपहरण, दुचाकी चोरीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी स्मार्ट व सुरक्षित नाशिक प्रकल्पाअंतर्गत राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून शहरात ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला होता, यात महानगरपालिकेकडून ४३३ ठिकाणी १८४४ कॅमेरे तर पोलीस आयुक्तालयाकडून ३४३ ठिकाणी ११०६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार होते. या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. मनपा व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त प्रकल्पातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ४५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असले तरी पहिल्या टप्प्यात ८०० कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी मनपाच्या वतीने २७६ पैकी २१० कॅमेरे शहरातील मनपाच्या इमारती, रुग्णालये, पाण्याच्या टाक्या व इतर महत्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. पावसाळा असल्याने रस्त्यावरील कॅमेरे बसविण्यास विलंब झाला आहे, उर्वरित कॅमेरे १ ऑक्टोबरपासून बसविण्यात येतील. : सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -