घरताज्या घडामोडीरात्री ड्युटीवरुन घरी जाणार्‍या महिलेचा विनयभंग

रात्री ड्युटीवरुन घरी जाणार्‍या महिलेचा विनयभंग

Subscribe

ड्युटीवरुन घरी जाणार्‍या महिलेचा पाठलाग करत तिघांनी तिचा विनयभंग केल्याची घटना जेलरोडवरील पंचक परिसरात शनिवारी (दि.१६) रात्री ९.३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रर दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

निखिल बोराडे (रा. पिंपळपट्टी, बोराडेमळा, जेलरोड ), पृथ्वीराज गायकवाड, उमेश बागुल (पुर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी महिला दुचाकीने ड्युटीवरून घराच्या दिशेने येत असताना तीन संशियतांनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. तिघांनी महिलेची दुचाकी अडवून त्यांचा विनयभंग केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. शेळके करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -