घरमहाराष्ट्रनाशिकजन्माने नव्हे तर त्याच्या कर्तुत्वाने मनुष्याची ओळख

जन्माने नव्हे तर त्याच्या कर्तुत्वाने मनुष्याची ओळख

Subscribe

विश्वास नांगरे-पाटील : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

प्रतिकूल परिस्थितीतही दिशा ठरविण्याचे सामर्थ्य असलेली व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर सहजगत्या मात करू शकतो. माणसाची ओळख त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्तुत्वाने ठरत असते, असे मत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी येथे व्यक्त केले.

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (दि.31) स्पर्धा परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर निर्भया पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भावना महाजन, पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी, संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब वाघ, प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, उपप्राचार्य प्रा.दिलीप कुटे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शरद काकड, स्पर्धा परिक्षा विभाग प्रमुख प्रा. चंद्रप्रकाश कांबळे, विशाखा समितीच्या प्रमुख सरिता देवकर, डॉ.राजेंद्र सांगळे यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी पोलीस आयुक्त नांगरे पाटील म्हणाले की, विचारातून शब्द, शब्दातून कृती आणि कृतीतून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडत असते. त्यामुळे महाविद्यालयीन युवक-युवतींनी आपले विचार सुदृढ करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजात वाढणारी गुन्हेगारी, गैरवर्तनावर नियंत्रण आणण्यासाठी युवकामध्ये सामाजिक शिस्तीची संकल्पना रुजविणे गरजेचे आहे. शिवाय प्रत्येक युवक-युवतींना स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेरणा तयार होणे गरजेचे असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुसज्ज करण्यात येईल. त्याचा तळागाळातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सक्षमरीत्या यशस्वी होईल. प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून वागल्यास एका सक्षम समाजाची निर्मिती होईल, असे मत थोरे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी केले. अतिथींचा परिचय उपप्राचार्य प्रा. दिलीप कुटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शरद काकड यांनी केले. आभार प्रा. राजेंद्र सांगळे यांनी मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -